नाटळ सहकारी सेवा सोसायटीच्या वतीने विविध उपक्रम

विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी व शेतकऱ्यांचा सत्कार
गावातील तरुनांना उद्योजक बनण्याची सुवर्णंसंधी मिळावी या हेतूने त्यांना व्यवसायासाठी संस्था कर्ज वाटप परत आहे. याचा फायदा घेत तरुणांनी व्यवसायात वृद्धी करत स्वावलंबी बनावे असे प्रतिपादन नाटळ सहकारी सेवा सोसायटी अध्यक्ष एन बी सावंत यांनी नाटळ ग्रामपंचायती मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत केले.
कणकवली तालुक्यातील नाटळ सहकारी सेवा सोसायटी ची सर्वसाधारण सभा खेळी मेळीच्या वातावारणात बुधवारी ग्रामपंचायत च्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी प्रगतशील शेतकरी तसेच १० वि व १२ वी मध्ये विशेष प्रविण्य मिळविलेल्या विध्यार्थ्यांचा सोसायटीच्या वतीने शैक्षणिक साहित्य देत सत्कार करण्यात आला.
यावेळी नाटळ सहकारी सेवा सोसायटी अध्यक्ष एन. बी. सावंत, उपाध्यक्ष तुकाराम नाटळकर, उपसरपंच पंढरीनाथ तायशेटे, गटसचिव गौरव सावंत, संचालक मिलिंद डोंगरे, किशोर परब, दत्ताराम खरात, दीपक पांगम, दशरथ सुतार,प्रतिभा कुडतरकर, चंद्रकांत सुतार, संतोस खरात, सेल्समन राधिका कुडतरकर, प्रगतशील शेतकरी मनोज सावंत, सुभाष घाडीगावकर, विश्वास सावंत, सचिन सावंत, साबाजी सावंत, दयानंद घाडीगावकर, अर्जुन दळवी, सभासद, ग्रामस्थ,विध्यार्थी उपस्थित होते.
सभेच्या सुरवातीला अहवाल साला मध्ये खातेदार, शहीद जवान, थोरनेते, संशोधक, साहित्यिक, कलावंत, शिक्षक तज्ञ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नंतर नोटीस चे वाचन करण्यात आले.
यावेळी गावातील प्रगतशील शेतकरी मनोज सावंत, सुभाष घाडीगावकर, विश्वास सावंत, साबाजी सावंत, दयानंद घाडीगावकर, अर्जुन दळवी तसेच विध्यार्थी प्राची चव्हाण, श्रावणी गुडेकर, विशाखा सांगवेकर, पायल जाधव, पल्लवी आर्डेकर, सलोनी परब, इशांका गोसावी, स्नेहा पवार यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
उपस्थित ग्रामस्थांना प्रगतशील शेतकरी मनोज सावंत यांनी आपण कशा पद्धतीने व्यवसायात वृद्धी केली, तरुणांनी व्यवसायात कशी प्रगती करावी याबाबत सविस्तर माहिती दिली. सुभाष घाडीगावकर, विश्वास सावंत, दयानंद घाडीगावकर, अर्जुन दळवी यांनी ही बहुमोल असे मार्गदर्शन केले. संस्थेने गेल्या तीन वर्षात उत्तुंग अशी भरारी घेत कर्ज वाटप, वसुली, लाभांश देण्यात तसेच कर्जवसुलीत आघाडी घेतली आहे.त्यामुळे बँकेने संस्थेचे अभिनंदन केले आहे.
आमची लाडकी पाळीव कुत्री “झेना” (पॉमेरियन जात) दिनांक 7 फेब्रुवारीच्या रात्रीपासून हरवली आहे. ती आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे.
🐶 नाव: झेना
🐾 जात: पॉमेरियन
🎨 रंग: तांबूस/तांबड्या रंगाचे केस
📏 उंची: सुमारे 1 फूट
🎂 वय: 2 वर्षे
ती कोणाला दिसल्यास, सापडल्यास किंवा तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास कृपया त्वरित संपर्क साधावा.
झेनाला सुरक्षित परत आणून देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल.
📍 पत्ता: धुरीवाडा, मालवण
(तोंडवळकरांच्या चक्कीच्या बाजूचे घर)
📞 संपर्क: 7506829118
— कौस्तुभ चंद्रकांत फोंडबा
🙏 कृपया ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा. तुमची एक शेअर आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद.





