न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचराचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सुयश

मालवण तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा येथील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत उत्तुंग यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत कु. समर्थ जितेंद्र घाडी याने ४०० मी. धावणे (द्वितीय) कु. आशीर्वाद प्रमोद सातपुते याने ८०० मी. धावणे (प्रथम) व ३००० मी. धावणे (द्वितीय)तर कु. श्रद्धा सुनील रुपये २०० मी. धावणे (द्वितीय) क्रमांक मिळवित यश संपादन केले. या तीन विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी डेरवण, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे निवड झालेली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग तसेच ग्रामस्थ यांच्यावतीने अभिनंदन करण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांनी विभागीय स्तरावरही उत्तम यश संपादन करावे, अशा शुभेच्छा सर्व स्तरातून देण्यात आल्या आहेत.





