तळेरे येथे आकाश कंदील स्पर्धेचे आयोजन

व्यसनमुक्त समाज | स्वच्छ भारत | पाणी वाचवा | निसर्गाचे रक्षण | बालशिक्षण विषयावर आकाश कंदील स्पर्धा
दिविजा वृद्धाश्रम, सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट, वाचनालय व प्रज्ञांगणचे आयोजन
असलदे येथील दिविजा वृद्धाश्रम, तळेरे येथील स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट व वाचनालय आणि डॉ. अनिल नेरुरकर (MD) – अमेरिका प्रेरित प्रज्ञांगण यांच्या संयुक्त विद्यमाने आकाश कंदील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असून यातून सामाजिक संदेश अपेक्षित आहे. सदरची स्पर्धा 18 ऑक्टोबर रोजी तळेरे येथील प्रज्ञांगण येथे होईल.
दिवाळी निमित्त या स्पर्धेचे आयोजन केले असून यातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, पर्यावरणपूरकता, संदेशप्रधानता आणि सामाजिक संवेदनशीलता वाढविणे हा उद्देश आहे. या स्पर्धेत तयार झालेले सर्व आकाश कंदील “दिविजा आश्रम, असलदे” येथील आजी-आजोबांसाठी भेट दिले जाणार आहेत. ही स्पर्धा एकूण तीन गटात होणार आहे.
या स्पर्धेतील गट 1 (इ. 1 ली ते 4 थी) साठी कंदील आकार 1 फूट आकाराचा आवश्यक असून यामधील विजेत्यांना रोख ₹400 / ₹300 / ₹200, प्रत्येकी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तर उत्तेजनार्थ स्पर्धांकासाठी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
गट 2 (इ. 5 वी ते 10 वी) साठी कंदील आकार किमान 1.5 फूट आकाराचा आवश्यक असून यामधील विजेत्यांना रोख ₹500 / ₹300 / ₹200, प्रत्येकी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तर उत्तेजनार्थ स्पर्धकांसाठी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
गट 3 (खुला गट – महाविद्यालयीन / महिला / नागरिक) साठी कंदील आकार किमान 1.5 फूट आकाराचा आवश्यक असून यामधील विजेत्यांना रोख ₹700 / ₹500 / ₹300, प्रत्येकी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तर उत्तेजनार्थ स्पर्धकांसाठी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर सहभागी सर्व स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र दिले जाईल.
या स्पर्धेत सहभागासाठी नाव नोंदणी आवश्यक असून त्यासाठी सौ. श्रावणी सतीश मदभावे (7719858387), श्री. निकेत पावसकर (94031 20156), श्री. संदेश शेट्ये (92232 21400) यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घेऊन यशस्वी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





