शेर्पे अंगणवाडी केंद्र येथे राष्ट्रीय पोषण महा अभियान संपन्न

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत कणकवली तालुक्यातील शेर्पे या गावी राष्ट्रीय पोषण महा सप्ताह कार्यक्रम नुकताच येथील अंगणवाडी केंद्रात माजी जि.प.सदस्य श्री रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
कुरंगवणे,बेर्ले व शेर्पे या तीन गावांच्या अंगणवाडी केंद्राने संयुक्तिक मिळून शेर्पे येथे घेतलेल्या या कार्यक्रमाला सरपंच सौ स्मिता पांचाळ,उपसरपंच श्री सिराज मुजावर,एकात्मिक बाल विकास प्रकल्प कणकवलीच्या अंतर्गत येणाऱ्या खारेपाटण बीटच्या मुख्य सेविका श्रीम.नीना कडुलकर,ग्रा.पं. सदस्य श्री सायली पांचाळ,माजी सरपंच श्रीम.निशा गुरव,शेर्पे शाळेचे मुख्याध्यापक श्री शिंगारे सर, अंगणवाडी सेविका तसेच अशा स्वयंसेविका आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे शेर्पे अंगणवाडीच्या सेविका श्रीम. मानसी शेलार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.तर येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी या कार्यक्रमाचे छान आयोजन केल्याबद्दल शेर्पे ग्रामपंचायतीच्या वतीने कौतुक करण्यात आले. यावेळी अंगणवाडीच्या मुख्य सेविका श्रीम.कडूलकर यांनी बाळांच्या सकस आहार व आरोग्याच्या दृष्टीने घेण्याची काळजी यावर मार्गदर्शन केले.तर शेर्पे येथील अंगणवाडी ही भौतिक सोयी सुविधायुक्त अतिशय सुंदर व आकर्षक अंगणवाडी असून या अंगणवाडीला आय एस ओ मानांकन मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी जि.प. सदस्य श्री रवींद्र जठार यांनी यावेळी सांगितले.
या राष्ट्रीय पोषण माहच्या निमित्ताने येथे भरविण्यात आलेल्या विविध पौष्टिक पदार्थांचे प्रदर्शन लक्षवेधी ठरले.यावेळी गरोदर मतांची अंगणवाडी ताईंच्या वतीने सन्मानपूर्वक ओटी भरण्यात आली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेर्पे ,कुरंगवणे व बेर्ले येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला माता पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचन अंगणवाडी सेविका श्रीम.पाताडे मॅडम यांनी केले.





