शिडवणे जि.प.शाळा नं.१ येथे ग्रामपंचायत ची शैक्षणिक ग्रामसभा संपन्न

शिडवणे गाव येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिडवणे नं.१ या शाळेत ग्रामपंचायतीच्या वतीने शैशणिक ग्रामसभा नुकतीच गावचे सरपंच श्री रवींद्र शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या शैक्षणिक ग्रामसभेला माजी जि.प.बांधकाम व वित्त सभापती श्री रवींद्र उर्फ बाळा जठार यांची प्रमुख उपस्थिती होती.तर या सभेला उपसरपंच श्री दीपक पाटणकर,निवृत्त पोलिस अधिकारी श्री विजय टक्के,खारेपाटण कॉलेजचे शिक्षक व रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे अध्यक्ष श्री दयानंद कोकाटे,शिडवणे शाळा नं.१ च्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दिनेश रांबाडे,ग्रा.पं. सदस्य श्री दयानंद कुडतरकर, खारेपाटण हायस्कूलच्या शिक्षक सौ प्राजक्ता कोकाटे च्या शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रवीण कुबल, प्राथमिक शिक्षक श्री कुडतरकर सर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी झालेल्या शैक्षणिक ग्रामसभेस माजी जि.प.सदस्य श्री रवींद्र जठार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,प्रत्येक गोष्टीत प्रशासनावर अवलंबून न राहता नागरिकांनी लोकसहभागातून आपल्या शाळेचा भौतिक विकास करण्यासाठी पालक व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन काम केल्यास शाळांचा सर्वांगीण विकास व्हायला वेळ लागणार नाही.यावेळी सरपंच श्री रवींद्र शेट्ये यांनीं देखील गावातील शाळांसाठी ग्रामपंचायत स्तरावर सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे सांगितले.
शिडवणे येथे संपन्न झालेल्या या शैशणिक ग्रामसभेला गावातील नागरिक,पालक व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!