तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत त्रिंबक हायस्कूलचे नेत्रदीपक यश

त्रिमूर्ती हायस्कूल शिरवंडे येथे 23 व 24 सप्टेंबर 2025 ला संपन्न झालेल्या मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी विविध गटांमध्ये नेत्रदीपक यश संपादन केले आहे. त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धेत 14 वर्षे मुली/ मुलगे गटांमध्ये मयुरेश साहिल 600 मीटर धावणे प्रथम क्रमांक, ईश्वरी त्रिंबककर 100 मीटर हर्डल्स प्रथम क्रमांक व 600 मीटर धावणे तृतीय क्रमांक, सिद्धी आईर 200 मीटर धावणे तृतीय क्रमांक, दुर्वा घाडीगांवकर 400 मीटर धावणे तृतीय क्रमांक, सेजल राऊत गोळा फेक तृतीय क्रमांक, सतरा वर्षे मुली /मुलगे गटामध्ये उन्मेश परब 800 मीटर धावणे द्वितीय क्रमांक, आर्यन अपराज 110 मीटर हर्डल्स द्वितीय क्रमांक, श्रावणी गांवकर 1500 मीटर धावणे द्वितीय क्रमांक, व 110 मीटर हर्डर्स तृतीय क्रमांक, आर्या बागवे 400 मीटर हर्डल्स द्वितीय क्रमांक, श्रुतिका साहिल 3000 मीटर धावणे तृतीय क्रमांक, उदय साटम 3000 मीटर धावणे तृतीय क्रमांक सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थाध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा सकपाळ, कार्यवाह अरुण घाडी, मुख्याध्यापक प्रवीण घाडीगांवकर, प्रशांत गोसावी, अभिजित धुरे, एकनाथ गायकवाड, सर्व संचालक मंडळ शिक्षक, पालक, ग्रामस्थ सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक महेंद्र वारंग सर यांचे मार्गदर्शन लाभले.





