जनआशिर्वाद यात्रे प्रकरणी पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्यासहित संशयीचा आरोपींची निर्दोष मुक्तता

सर्वांच्या वतीने ॲड. राजेश परुळेकर, ॲड. ओंकार परुळेकर यांचा युक्तिवाद
27 ऑगस्ट 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची जन आशीर्वाद यात्रा त्यांच्या पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने कोणताही कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कणकवली पोलीस ठाण्यातून भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना व शिवसेने पक्षाच्या पदाधिका कार्यकर्त्यांना सीआरपीसी 149 नोटीस बजावणी केली होती. जिल्ह्यात कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 ते कलम 37 (1 )(3 )नुसार 24 /8 /21 पासून 7/ 9/ 21 पर्यंतच्या कालावधीमध्ये मनाई आदेश लागू केला होता. त्याबाबत पोलीस वाहनावरील ध्वनी क्षेत्रामध्ये प्रसिद्ध केली होती. अशा परिस्थितीत नितेश राणे तत्कालीनआमदार कणकवली विधानसभा , निलेश राणे, सुरेंद्र कोदे, समीर नलावडे, संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, शिशिर परुळेकर, राकेश परब, चंद्रहास उर्फ बबलू सावंत, मनोज रावराणे, राजन चीके, दिलीप तळेकर, बाळा जठार, संदेश सावंत वगैरे 40 ते 50 लोकांनी खारेपाटण तरळे फोंडाघाट कणकवली पटवर्धन चौक शिवाजी चौक तेलीआळी नरडवे नाका कणकवली येथे जन आशीर्वाद यात्रा सभेचे आयोजन करून बेकायदा जमाव करून मिरवणूक काढून मिरवणुकी दरम्यान नारायण राणे अंगार है बाकी सब भंगार आहे , आता कसं वाटतंय गार गार वाटतंय, अशा घोषणा देऊन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या मनाई आदेशाचा भंग केला. अशी फिर्याद अनमोल अनंत रावराणे पोलीस उपनिरीक्षक कणकवली यांनी कणकवली पोलीस स्टेशनला दाखल केली. सदर फिर्यादी अनुसरून कणकवली पोलिसांनी भादवि कलम 143 व पोलीस अधिनियम 135 प्रमाणे नितेश राणे वगैरे 22 यांचे वर गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याची चौकशी चालून पुराव्याअभावी न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे ॲड. राजेश परुळेकर व ॲड. ओंकार परुळेकर यांनी काम पाहिले.





