विद्यापीठ विभागीय बॅडमिंटन स्पर्धत गोगटे-जोगळेकर कॉलेजला अजिंक्यपद

पुरुष आणि महिला विभागात एसपिके सावंतवाडी कॉलेज उपविजेते
मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभाग अंतर्गत विभाग ४ च्या आंतरमहाविद्यालयीन पुरुष आणि महिला बॅडमिंटन स्पर्धेत रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने पुरुष आणि महिला विभागाचे अजिंक्यपद मिळविले आहे. एसपिके सावंतवाडी कॉलेजला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. संत राउळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे मुंबई विद्यापीठाच्या या विभागीय बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात आल्या.
मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभाग अंतर्गत विभाग ४ च्या आंतरमहाविद्यालयीन मुलांच्या बॅडमिंटन स्पर्धेसाठी १९ संघ सहभागी झाले होते तर एकूण १०६ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. यामध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी यांनी प्रथम क्रमांक तर एसपीके महाविद्यालय सावंतवाडी संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ आणि कणकवली महाविद्यालय कणकवली यांना अनुक्रमे द्वितीय, तृतीय आणि चौथा क्रमांक प्राप्त केला. तसेच निवड चाचणीमध्ये खेळाडू सहभागी झाले होते.
महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेसाठी १३ संघ सहभागी झाले होते यात एकूण ५७ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तर एसपीके सावंतवाडी यांनी द्वितीय, एस आर एम महाविद्यालय कुडाळ तृतीय तर कणकवली महाविद्यालय कणकवली यांना चौथा क्रमांक प्राप्त झाला.
या स्पर्धेसाठी जयेश धुरी यांनी नियंत्रक म्हणून तर प्रद्युम जाधव, प्रथमेश राणे, आदित्य ठाकूर, प्रतीक वंजारे व तबस्सुम शेख यांनी पंच म्हणून काम पाहिले. महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाने काटेकोर नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला. तसेच यासाठी महाविद्यालयामधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं सहकार्य लाभले.





