आचरा येथे स्वच्छता हि सेवा अंतर्गत घर तेथे शोषखड्डा अभियानास प्रारंभ

स्वच्छता हि सेवा अंतर्गत घर तेथे शोषखड्डा अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत आचराने पुढाकार घेतला आहे. याचा शुभारंभ आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली वरचीवाडी येथील सुशील धुरी या लाभार्थ्यांच्या परसात शोषखड्डा खोदून करण्यात आला. यावेळी सरपंच जेरोन फर्नांडिस, मनिष सावंत पंचायत समिती मालवण कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक प्रथमेश आचरेकर, जीवरक्षक अक्षय वाडेकर, ग्रा. प. कर्मचारी गिरीधर आपकर, नरेश परब आदी उपस्थित होते.





