कुडाळ न. पं. च्या ट्रॅक्टरखाली दोन दुचाकीस्वार चिरडले

दोघेही गंभीर जखमी

नगरपंचायतीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरखाली सापडून दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
नगरपंचायतीचे बॅनर काढण्याचे काम सुरू असताना हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ नगरपंचायत हद्दीत लावण्यात आलेले बॅनर काढण्याचे काम सुरू होते. हे बॅनर ट्रॅक्टरमध्ये टाकून आणले जात असताना, अचानक ट्रॅक्टरवरील चालकाचा ताबा सुटला. अनियंत्रित झालेल्या या ट्रॅक्टरखाली दोन दुचाकीस्वार चिरडले गेले. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. दोन्ही जखमींना अधिक उपचारांसाठी तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची नोंद स्थानिक पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

error: Content is protected !!