अपघात करून ऊस तोडणी कामगाराचे मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

आरोपी तर्फे ऍड अक्षय चिंदरकर यांनी काम पाहिले.
तीन मार्च २०२०रोजी आरोपी मारुती तुकाराम कतुरे राहणार कोल्हापुर याने आपल्या ताब्यातील टाटा ट्रक क्रमांक MH/09/C/8179 महादेवाचा माळ या ठिकाणी ऊसतोडणी चालू असताना हयगयीने व अविचाराने चालवल्याने ऊस तोडणी कामगाराच्या मुलीला ठोकर देत अपघात करून तिला गंभीर दुखापत करून तिचे मृत्यूस कारणीभूत झाल्यामुळे फिर्यादी त्र्यंबक गंगाराम चिरमाडी राहणार परभणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैभववाडी पोलीस स्टेशन येथे भा. द. वि. कलम ३०४(अ), २७९ व मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. केसचे कामी सरकार पक्षातर्फे तपासण्यात आलेल्या साक्षीदारांच्या जबाबातील तफावत व सबळ पुराव्याअभावी तसेच आरोपीचे वकिलांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानत कणकवली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. एस. जी. लटूरिया यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.





