देवगड गिरीये समुद्रात मच्छीमारी नौका बुडाली

मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेली देवगड बंदरातील ‘त्रिवेणी’ नौका बंदराकडे परत येत असतानाच गिर्ये-काळोशी समुद्रात 15 वाव अंतरावर बुडाली.

वादळी वाऱ्यामुळे नौकेच्या तळाकडील दोन लाकडी फळ्या उचकटल्याने नौकेत पाणी शिरून ही नौका पूर्णपणे बुडाली. गुरुवार, सायं. ७.३० वा. सुमारास ही
दुर्घटना घडली.

देवगड येथील राजेंद्र बाळकृष्ण
भिल्लारे यांच्या मालकीची ही नौका होती. सुदैवाने दुसऱ्या नौकेची तत्काळ मदत मिळाल्यामुळे ‘त्रिवेणी’ नौकेवरील सर्व सहा खलाशांना सुखरूप वाचविण्यात यश आले.

या दुर्घटनेत नौकेसह त्यावरील साहित्याचे मिळून २५ लाखांचे नुकसान झाले, अशी माहिती देवगडचे सहा. मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी दिली आहे

समुद्रात लाटांच्या तडाख्यामुळे या बोटीनच्या दोन फळ्या तुटल्या अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे

error: Content is protected !!