भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसा दिवशी प्रमोद जठार यांनी भेट घेतल्या शुभेच्छा

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस राज्यभरात उत्साहात होतोय साजरा

भारतीय जनता पार्टीचे कणकवली विधानसभेचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी भाजपाचे माजी मंत्री प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची डोंबिवली येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी त्यांच्या समवेत उद्योजक सुनील खाडे उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा होत असून माजी आमदार प्रमोद जठार व रवींद्र चव्हाण यांचे ऋणानुबंध आहेत. प्रमोद जठार व रवींद्र चव्हाण यांची मैत्री सर्वश्रुत असताना आज वाढदिवसा दिवशी त्यांची निवासस्थानी भेट घेऊन श्री जठार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!