बौद्ध समाज बांधवांनी स्थापन केलेल्या तथागत नागरी सहकारी पतसंस्था सिंधुदुर्गची १ ली वार्षिक सभा दि.२० सप्टेंबर २०२५ रोजी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्ध बांधवांनी आपल्या आर्थिक उन्नती व उत्कर्षासाठी एकत्र येऊन सन २०२४ मध्ये स्थापन केलेल्या तथागत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग या सहकारी पतसंस्थेची १ ली वार्षिक सर्वसमाधारण सभा शनिवार दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी दु. २.३० वाजता भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे संस्थेचे अध्यक्ष श्री. अरविंद वळंजू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
तथागत नागरी सहकारी पतसंस्थेची ही पहिलीच वार्षिक सर्वसाधारण सभा असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्ध समाजामध्ये या सभेविषयी उत्सुकता व आनंदी वातावरण आहे.तर सभासदांच्या विश्वासार्हतेला कुठल्याही प्रकारचा तडा जावू न देता गेली वर्षभर संस्थेने खडतर प्रवास करत संस्थेच्या वार्षिक कामाच्या कालावधीचा लेखा जोगा अहवालरूपी लिखित स्वरूपात सभासदासमोर पोहचविण्याचा संस्थेच्या विद्यमान संचालकांनी केलेला प्रयत्न निश्चितच कौतुकास पात्र आहे. तरी या संस्थेच्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेस संस्थेच्या सर्व सभासदनी वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन तथागत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग या संस्थेचे सचिव श्री. सुनील कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

error: Content is protected !!