‘सक्षम विद्यार्थी सक्षम भारत’ अंतर्गत कुडाळ इनरव्हील क्लब सर्वोत्तम – सौ. उत्कर्षा पाटील

कुडाळ इनरव्हील क्लब कडून एकाच वेळी ५०० विद्याथ्यांना करियर मार्गदर्शन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ‘सक्षम विद्यार्थी सक्षम भारत करिअर मार्गदर्शन’ उपक्रमांतर्गत इनरव्हील क्लब ऑफ कुडाळचा पुढाकार कौतुकास्पद आहे. एकाच दिवशी बौध्दिक क्षमता चाचणीचा ५०० विद्यार्थ्यांना लाभ देणारा इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ हा डिस्ट्रिक्ट 317 मध्ये एकमेव क्लब ठरला आहे. याबद्दल इनरव्हिल अध्यक्षा सौ सानिका मदने, सचिव सौ. सई तेली व टीम अभिनंदनास पात्र आहेत, असे गौरवोद्गार इनरव्हील डिस्ट्रिक्ट 317 च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ. उत्कर्षा पाटील यांनी काढले. कुडाळ हायस्कूल येथील कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून एकाच दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, कणकवलीतील 500 विद्यार्थ्यांना बौध्दिक क्षमता चाचणीचा लाभ दिला. यासाठी जयसिंगपूर येथील चाॅईस करिअर अकॅडमीचे आकाश कोळी, संदिप भिसे, जगन्नाथ निखाळजे हे उपस्थित होते. यामध्ये कुडाळ हायस्कूल 50 विद्यार्थी, आयडीयल इंग्लिश स्कूल वरवडे कणकवली 100, कनेडी हायस्कूल कणकवली 108, न्यू इंग्लिश स्कूल कसाल 40, न्यू इंग्लिश स्कूल ओरोस 46, तुळसुली हायस्कूल 26, मांडकुली हायस्कूल 21, सरंबळ हायस्कूल 20, पांग्रड हायस्कूल 29, तळगाव हायस्कूल 25, चेंदवण हायस्कूल 20, कुडाळ ग्रामीण मधील 35 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
कुडाळ हायस्कुल मध्ये झालेल्या कार्यक्रमाला इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ अध्यक्षा सौ. सानिका मदने, माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन डाॅ. सायली प्रभू, रोटरी असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने,मुख्याध्यापक विपिन वराडे, चाॅईस करिअर अकॅडमी जयसिंगपूरचे जगन्नाथ निखाळजे, इनरव्हील सौ. सई तेली, प्रिती तायशेटये, राजश्री सावंत, वैशाली कुडाळकर, डाॅ. उज्वला सावंत, आरोही माने, अश्विनी डांगी, रोटरी माजी असिस्टंट गव्हर्नर नीता गोवेकर, राजन बोभाटे, शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते.
सौ. उत्कर्षा पाटील पुढे म्हणाल्या, ग्रामीण भागातील हुशार होतकरू विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन मिळत नसल्याने दहावी नंतर कोणते क्षेत्र निवडायचे याबाबत अडचणी निर्माण होतात यासाठी सक्षम विद्यार्थी सक्षम भारत करिअर मार्गदर्शन उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला यासाठी जयसिंगपूरच्या चाॅईस करिअर अकॅडमीच्या सीए मोनिका बलदवा यांच्याशी करार करण्यात आला. असे प्रतिपादन इनरव्हील डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ. उत्कर्षा पाटील यांनी कुडाळ येथे केले.
दोन आठवड्यानंतर सक्षम विद्यार्थी सक्षम भारत करिअर मार्गदर्शन उपक्रमांतर्गत सहभागी झालेल्या 500 विद्यार्थी व पालकासाठी कणकवली, ओरोस व कुडाळ येथे जयसिंगपूरच्या चाॅईस अकॅडमीच्या मोनिका बलदवा यांचे उपस्थित विशेष सेमिनार आयोजित केले जाणार असल्याचे इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ च्या अध्यक्षा सौ. सानिका मदने यांनी सांगितले. या सेमिनारमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांला बौध्दिक क्षमता चाचणी विश्लेषणाचे बुकलेट व विविध करिअर क्षेत्राबद्दल सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
हा उपक्रम यशस्वितेसाठी रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचे गव्हर्नर एरिया एड डाॅ. विद्याधर तायशेटये, कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन सतिश सावंत, रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलचे अध्यक्ष अरूण मालणकर, सचिव दिपक आळवे, रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे अध्यक्ष राजीव पवार, सचिव मकरंद नाईक, खजिनदार राकेश म्हाडदळकर, गजानन कांदळगावकर, अमित वळंजू, असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने, इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ च्या डाॅ उज्वला सावंत, तळगाव संस्था चेअरमन उत्तम दळवी, सरंबळ इंग्लिश स्कूल सरंबळ माजी विद्यार्थी मंडळ, चेंदवण उपसरपंच सौ. रश्मी नाईक, आदींचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे प्रतिपादन इनरव्हील अध्यक्षा सौ. सानिका मदने यांनी सांगितले.
इनरव्हील डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ. उत्कर्षा पाटील या पहिल्यांदाच सक्षम विद्यार्थी सक्षम भारत करिअर मार्गदर्शन उपक्रमांतर्गत कुडाळ हायस्कूल येथे सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेबद्दल इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून सौ. पाटील यांचा शाल व बुके इनरव्हील अध्यक्षा सौ. सानिका मदने यांचेहस्ते देवून विशेष सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन सचिन मदने यांनी केले तर आभार सई तेली यांनी मानले.

error: Content is protected !!