कुडाळ इनरव्हील क्लबचा करिअर मार्गदर्शन उपक्रम प्रेरणादायी – सौ रश्मी नाईक

इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ तर्फे चेंदवणमध्ये करिअर मार्गदर्शन उपक्रम

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इनरव्हील क्लब ऑफ कुडाळचा करिअर मार्गदर्शन उपक्रम प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार चेंदवणच्या माजी उपसरपंच सौ रश्मी नाईक यांनी काढले. इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून सक्षम विद्यार्थी सक्षम भारत करिअर मार्गदर्शन उपक्रमांतर्गत चेंदवण हायस्कूल मध्ये बौध्दिक क्षमता चाचणी आयोजित करण्यात आली यावेळी सौ. रश्मी नाईक बोलत होत्या.
यावेळी चेंदवण हायस्कूल चे स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन देवेंद्र नाईक, माऊली देवस्थान उपसमिती अध्यक्ष संजय परब, मुख्याध्यापक माणिकराव पवार, शिक्षक नाईक सर, सांगळे सर, सौ. गवस मॅडम उपस्थित होते.
इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ च्या या उपक्रमांतर्गत चेंदवण हायस्कूल मधील 20 विद्यार्थ्यांनी बौध्दिक क्षमता चाचणीमध्ये सहभाग घेतला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी देवेंद्र नाईक व सौ. रश्मी नाईक यांनी विशेष सहकार्य केले. याबद्दल मुख्याध्यापक माणिकराव पवार यांनी विशेष आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!