इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचराच्या गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

३९दिवस चालणार गणेशोत्सव
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचराच्या ३९ दिवस चालणा-या गणेशोत्सवात देवस्थान समिती व ग्रामस्थांच्या सहकार्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त
रविवार ७सप्टेंबर रोजी रात्रौ ठिक ९वाजता ब्राह्मण देव मिराशी वाडी व महापुरुष मित्र मंडळ वरचीवाडी पुरस्कृत वालावलकर दशावतार नाट्य मंडळ ओसरगाव यांचा काल भुजंग संहार हा दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहे.सोमवार ८ सप्टेंबर रोजी रात्रौ ठीक नऊ वाजता बालगोपाळ मंडळ वरची वाडी पुरस्कृत सुप्रसिद्ध गायिका श्रृती पाटील आणि सुप्रसिद्ध भजनकार गायक अजित गोसावी यांच्या भक्ती गीतांचा बहारदार कार्यक्रम भक्तिरंग सादर होणार आहे. बुधवार 10 सप्टेंबर रोजी रात्रौ ठिक ९वाजता व्यापारी मंडळ आचरा आणि वैभवशाली पतसंस्था पुरस्कृत सुप्रसिद्ध कीर्तनकार ह भ प हरिहर नातू पुणे यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे.
शुक्रवार 12 सप्टेंबर रोजी रात्रौ ठीक नऊ वाजता समर्थ नगर वरची वाडी पुरस्कृत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ कुडाळ यांचे दशावतारी नाट्य ब्रह्म संकेत हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. शनिवार १३ सप्टेंबर रोजी ब्राह्मण देव सांस्कृतिक विकास मंडळ पारवाडी पुरस्कृत श्री हेळेकर दशावतार नाट्य मंडळ कारिवडे यांचा नाट्य प्रयोग वैभव लक्ष्मी ,रविवार १४ सप्टेंबर रोजी रात्रौ ठीक नऊ वाजता शिवरामेश्वर ट्रॅव्हल्स बाणे पुरस्कृत सुधीर कलिंगन कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुळ यांचा दशावतारी नाट्यप्रयोग गोमय गणेश सादर होणार आहे .सोमवार १५ सप्टेंबर रोजी ग्रामोन्नती मंडळ पिरावाडी पुरस्कृत कार्यक्रम ,मंगळवार १६ सप्टेंबर रोजी संतोष कोदे पुरस्कृत गुरुकृपा दशावतार लोककला नाट्य मंडळ कणकवली हळवल यांचा नाट्यप्रयोग सवतीचे प्रेम सादर होणार आहे .बुधवार १७सप्टेंबर रोजी रात्रौ ठीक नऊ वाजता मनोज हडकर पुरस्कृत डबलबारी भजनाचा जंगी सामना बुवा गुंडू सावंत हनुमान प्रसादिक भजन मंडळ वर्दे विरुद्ध बुवा श्री दिनेश वागदेकर कमला प्रसादिक भजन मंडळ शेळके वेंगुर्ले यांच्यात रंगणार आहे. गुरुवार १८सप्टेंबर रोजी रात्रौ ठीक नऊ वाजता वाडोळी ग्रामस्थ आचरा भंडारवाडी यांचा लावण्य तारका ऑर्केस्ट्रा मुंबई सादर होणार आहे. शनिवार २० सप्टेंबर रोजी रात्रौ ठीक नऊ वाजता हिर्लेवाडी विकास मंडळ पुरस्कृत चिमणी पाखरे डान्स ॲकॅडमी यांचा व्हरायटी शो तारका सादर होणार आहे. रविवार २१ सप्टेंबर रोजी डोंगरेवाडी ग्रामस्थ १व२पुरस्कृत कार्यक्रम होणार आहे. शनिवार २७सप्टेंबर रोजी नृत्य स्पर्धा होणार आहे .सोमवार २९ सप्टेंबर रोजी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्त रात्रौ ठिक ९वाजता ईसवटी मंडळ आचरा जामडूल व प्रवीण प्रभाकर मेस्त्री पुरस्कृत तिरंगी डबलबारी चा जंगी सामना बुवा सुशांत जोईल श्री महापुरुष प्राथमिक भजन मंडळ कातवण ,बुवा श्री उदय पारकर श्री दत्तगुरु प्रसादिक भजन मंडळ कासर्डे, बुवा श्री सुजित परब कोटेश्वर प्रासादिक भजन मंडळ हरकूळ बुद्रूक यांच्यात रंगणार आहे शुक्रवार 3 ऑक्टोबर रोजी रात्रौ ठीक नऊ वाजता देऊळवाडी मित्र मंडळ पुरस्कृत जिल्हास्तरीय मंगळागौर फुगडी स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे शनिवार ४ ऑक्टोबर रोजी श्रींचे विसर्जन मिरवणूक निघणार आहे.





