कुडाळ येथे 13 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण ,मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ,सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून दिवाणी न्यायालय कुडाळ येथे शनिवार दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आलेले आहे. तालुका विधी सेवा समिती कुडाळ व तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे राष्ट्रीय लोक अदालत होणार आहे .
ज्या पक्षकारांचे दिवाणी न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारी कडील प्रकरणे किंवा सर्व राष्ट्रीयकृत बँका, सहकारी संस्था ,स्वायत्त संस्था, ग्रामपंचायत, नगरपंचायती कडील वाद पूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवायची आहेत, त्यांनी आपली प्रकरणे तालुका विधी सेवा समिती कुडाळ या कार्यालयाकडे लवकरात लवकर दाखल करावीत. ज्या पक्षकारांना आपले प्रकरण चर्चेद्वारे मिटवायचे असेल अशा पक्षकाराने वाद पूर्व चर्चेसाठी या न्यायालयात हजर राहावे किंवा तसे जमत नसेल तर फोन द्वारे संपर्क साधावा. त्यानुसार पक्षकारांना चर्चेची तारीख व माध्यम ठरवण्यात येईल.
लोक न्यायालय यशस्वीतेसाठी सहकार्य करावे असे आवाहन दिवाणी न्यायाधीश ( क स्तर ) कुडाळ तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष जी .ए. कुलकर्णी यांनी केले आहे.





