आचरा येथे 8सप्टेंबर रोजी भक्ती गीतांचा बहारदार कार्यक्रम भक्ती रंग सुप्रसिद्ध गायिका श्रृती पाटील आणि अजीत गोसावी यांचा सहभाग

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे चौघडयावरचा गणपती आचऱ्याचा विघ्नहर्ता गणेशोत्सव 2025 निमित्ताने श्री बाळगोपाळ मंडळ आचरा वरचीचावडी आयोजित आणि संदीप पाटील जयेंद्र पाटील पुरस्कृत सुप्रसिद्ध गायिका संगीत विशारद सौ श्रृती पाटील व संगीत अलंकार अजीत गोसावी बुवा यांचा भक्ती गीत गायनाचा बहारदार कार्यक्रम सोमवार 8सप्टेबर रोजी रात्रौ ठिक 9 वाजता रामेश्वर मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.त्यांना संगीत साथ हार्मोनियम सागर राठवड,तबला प्रसाद करंबेळकर तर पखवाज साथ संदीप मेस्त्री यांची लाभणार आहे तरी संगीत रसिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन बाळगोपाळ मंडळातर्फे करण्यात आले आहे.





