चिंदर नागोचीवाडी पडेकाप रस्त्याची दुर्दशा

ग्रामस्थ वाहनचालकांना होतोय त्रास
चिंदर नागोचीवाडी रस्त्याची पुर्णतः दुर्दशा झाली आहे. यामुळे रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी ग्रामस्थ वाहनचालक यांच्या कडून होत आहे.
सदर रस्ता २०१० मध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत करण्यात आला होता. मागील १५ वर्षात हा रस्ता एकदाही दुरूस्त करण्यात आला नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. यामुळे संपूर्णतः रस्त्याची खडी उखडून गेली आहे. रस्ता खराब झाल्यामुळे रिक्षावाले पडेकापला जाण्यास नकार देतात. त्यामुळे तेथील रहिवाशांना फारच त्रास सहन करावा लागत आहे.याबाबत तातडीने उपाययोजना न केल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा या भागातील ग्रामस्थांनी दिला आहे.





