ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर रविवारी बँकांच्या एटीएम मध्ये खडखडाट!

रविवार सुट्टी असल्याने अनेक बँकांच्या एटीएम मधील कॅश संपूनही त्याकडे दुर्लक्ष

नागरिकांची मात्र कॅश काढण्यासाठी सर्वत्र धावाधाव

गणेश चतुर्थी पूर्वी चाकरमानी मोठ्या संख्येने कणकवली सह सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालेले असतानाच चाकरमान्यांची ही संख्या पुढील दोन दिवस अजून वाढणार आहे. गणेशोत्सवाच्या या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील बहुतांशी एटीएम ही आज अगोदर दोन दिवसापासूनच खडखडाट असलेल्या स्थितीत आहेत. एटीएम मधील पैसे संपल्याने आज रविवारी दिवसभर अनेक नागरिक पैसे काढण्यासाठी पैसे असलेल्या एटीएमची शोधाशोध करत होते. परंतु एटीएम बहुतांशी बँकेच्या एटीएम मध्ये कॅश संपल्याचे चित्र रविवारी दुपारी होते. त्यामुळे बँकांनी या आपल्याकडून दिल्या जाणाऱ्या सेवेबाबत निदान उत्सव कालावधीमध्ये तरी अलर्ट राहणे गरजेचे असल्याची मागणी जनतेतून केली जात आहे. कणकवली शहरात अनेक बँकांची एटीएम आहेत. परंतु या बहुतांशी बँकांच्या एटीएम मधील कॅश आज संपल्याने अनेक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला. तसेच कॅश काढण्यासाठी अनेकांची धावाधाव देखील झाली. सध्या सर्वत्र ऑनलाईन व्यवहार केले जात असताना मात्र काही ठिकाणी कॅश पेमेंट स्वीकारले जाते. अनेक ठिकाणी कॅश ही अनिवार्य असते. अशावेळी रविवार असून देखील बँकांनी आज याबाबतीत उदासीन भूमिका घेतल्याचे चित्र दिसून आले. कारण कॅश संपताच बँकेकडून दिली जाणारी सेवा म्हणून याबाबत पुन्हा कॅश एटीएम मध्ये लोड करण्याची गरज आहे. परंतु आज दुपारपर्यंत अनेक बँकांची एटीएम खडखडाट झाल्याने सुट्टीचा दिवस असल्याने कॅश लोड करण्याकरिता अपवाद वगळता यंत्रणा अस्तित्वात नसल्याने नागरिकांची मात्र कॅश काढण्यासाठी सगळीकडे शोधाशोध सुरू होती.

error: Content is protected !!