खारेपाटण चेक पोस्ट येथे जिल्ह्यात येणाऱ्या गणेशभक्त चाकरमामान्यांसाठी मोफत चहा, बिस्कीट व पाणी वितरण

भाजपा खारेपाटण विभाग पुरस्कृत उद्योजक सतीश गुरव यांच्या सौजन्याने आयोजन
जिल्ह्यात दाखल होणाऱ्या गणेशभक्तांनी व्यक्त केले समाधान
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खरेपाटण येथे आज खारेपाटण चेकपोस्ट येथे भारतीय जनता पार्टी पुरस्कृत उद्योजक सतीश गुरव यांच्या मार्फत मोफत चहा बिस्कीट व पाणी वितरण करण्यात आले. भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या हस्ते या चहा बिस्कीट व पाणी स्टॉल चे उदघाट्न करण्यात आले. दिवस-रात्र प्रवास करून करून थकून आलेल्या मुंबईकर तथा चाकरमामान्यांसाठी खारेपाटण येथे ठेवण्यात आलेल्या मोफत चहा बिस्कीट व पाणी वितरण उपक्रमामुळे सर्व प्रवाश्यांनी समाधान व्यक्त केले. व भारतीय जनता पार्टी व सतीश गुरव यांचे आभार व्यक्त केले. जिल्ह्यात दाखल होणाऱ्या एस. टी. बसेस तसेच अनेक खाजगी वाहनामधून येणारे मुंबईकर, गणेश भक्त चाकरमानी खारेपाटण येथे थांबून भारतीय जनता पक्ष व सतीश गुरव यांच्यामार्फत ठेवण्यात आलेल्या मोफत चहा बिस्कीट व पाणी याचा आस्वाद घेऊन फ्रेश होऊन समाधानी होऊन पुढील प्रवासा साठी मार्गस्त होतं होते.या वेळी खारेपाटण सरपंच -प्राची इस्वलकर, उपसरपंच -महेंद्र गुरव, भाजपा तालुकाध्यक्ष -दिलीप तळेकर, माजी जि. प. सदस्य -बाळा जठार, तालुका सचिव शक्तिकेंद्र प्रमुख -सुधीर कुबल सामाजिक कार्यकर्ते – किरण गुरव, महिला तालुका कार्यकारणी सदस्य-उज्वला चिके, शेखर शिंदे, शक्तिकेंद्र प्रमुख- सूर्यकांत भालेकर, शेखर कांबळे, तेजस राऊत,शिवसेना तालुकाध्यक्ष – मंगेश गुरव, गुरु शिंदे, सुकांत वरुणकर, आरती गाठे, गणेश लवेकर, प्रवीण लोकरे, मोहन पगारे, नंदकिशोर कोरगावकर, आदी भाजपा व महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.





