चिंचवली ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष पदी महेश बांदिवडेकर यांची निवड

कणकवली तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायत येथे दि.शुक्रवार, दि. 25 ऑगस्ट 2025 रोजी पार पडलेल्या ग्रामसभेत महेश बांदिवडेकर यांची तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा निवड करण्यात आली.
या निवड प्रक्रियेत सूचक म्हणून सुनील नाना भालेकर यांनी प्रस्ताव मांडला. सूर्यकांत हरिश्चंद्र भालेकर यांनी त्याला अनुमोदन दिले.
महेश बांदिवडेकर यांच्या निवडीबद्दल ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य तसेच गावातील ग्रामस्थांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
ग्रामस्थांनी व्यक्त केले की, बांदिवडेकर यांच्या अध्यक्षतेखालील तंटामुक्ती समितीने यापूर्वी गावातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी मोलाचे कार्य केले असून, त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातही गावाच्या शांतता व सौहार्द वृद्धीसाठी सकारात्मक पाऊले उचलली जातील अशी अपेक्षा व्यक्त केली. यावर तंटामुक्तीचे अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त करताना माझ्यावर जो विश्वास दाखवला तो मी आपणा सर्वांच्या सहकार्याने सार्थ करेन अशी ग्वाही देऊन समस्त ग्रामस्थांचे आभार मानले.





