मंगेश गुरव यांची शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख पदी निवड

आमदार निलेश राणे यांनी नियुक्ती केली जाहीर

शिवसेना आमदार निलेश राणे यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघातील सहा प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नुकत्याच शिवसेना कणकवली संपर्क कार्यालयातील पत्रकार परिषदेत जाहीर केल्या. शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी खारेपाटण येथील मंगेश गुरव यांच्यावर सोपवली असून शिंदे गट शिवसेना स्थापन झाल्यापासून निष्ठेने कार्यरत असलेल्या मंगेश गुरव यांना पक्षनेतृत्वाने न्याय दिला आहे. मंगेश गुरव हे सध्या कणकवली उपतालुकाप्रमुखपदी कार्यरत होते. पक्षसंघटनेसाठी झटून काम केले आहे. पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून ही जबाबदारी दिल्या बद्दल
मी पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री मा. श्री एकनाथजी शिंदे यांचे आभार मानतो…
तसेच आमचे मार्गदर्शक शिवसेना उपनेते श्री संजयजी आंग्रे आमदार श्री किरण भैया सामंत,आमदार श्री नीलेशजी राणे, यांचे मनापासून आभार मानतो असे मत व्यक्त केले.
या पदाचा उपयोग तळागाळातील लोकांच्या विकासासाठी आणि पक्ष संघटना वाढीसाठी करणार असल्याचेही मंगेश गुरव यांनी सांगितले.यावेळी शिवसेना उपनेते संजय आग्रे, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, दादा साईल, महिला जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते, फोंडाघाट सरपंच संजना आग्रे उपस्थित होते.

error: Content is protected !!