त्या कारवाई मध्ये विचारली जाणारी निखिल नावाची व्यक्ती कोण?

अवैध धंद्यांवर कारवाईचे अपत्य निर्माण व्हायला 9 महिने का लागले?
माजी आमदार परशुराम उपरकर यांचा सवाल
पालकमंत्री नितेश राणे यांनी जी मटक्याच्या अड्ड्यावर धाड टाकली ती अभिनंदन स्वत आहे. पण पालकमंत्री यांनी या धाडीबाबत पत्रकार परिषद घेत माहिती दिली ती पाहता पालकमंत्र्यांचे हे अपयश आहे. गेली 10 वर्ष आमदार 9 महिने पालकमंत्री त्यांना हे सर्व धंदे माहिती होते. अवैध वाळू, जुगार, दारू, याबाबतची माहिती पोलिसांना दिली पण पोलीस कारवाई करत नाहीत पालकमंत्र्यांच्या आदेशाना त्यांनी केराची टोपली दाखवली याचा अर्थ पालकमंत्री यांचा अधिकाऱ्यांवर वाचक नाही असा टोला माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला. कणकवलीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, पालकमंत्र्यांचा स्वतःच्या कार्यकर्त्यांवर विश्वास नसल्याने गुपचूप स्वतः जाऊन त्यांना धाड टाकावी लागली. असा टोला उपरकर यांनी लगावला. आतापर्यंत आम्ही अनेकदा सांगितलेले की अवैध धंद्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्ताधारी गुंतलेले आहेत. त्यामुळेच काही कारवाई होत नाही. पालकमंत्र्यांनी टाकलेल्या धाडीदरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये आम्ही तुमचीच माणसे आहोत असे एकाने म्हटलेले स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच अवैध धंद्यांमध्ये सत्ताधाऱ्यांचे हात असल्याने कारवाई केली जात नव्हती. कालची कारवाई करत असताना निखिल नावाचा मनुष्य कोण? असे विचारत होते. कोणत्या तरी टेंडर मध्ये टक्केवारी गेली याचा राग धरून त्या मटका व्यवसायिकाशी संबंधित हे नाव असल्याने ही कारवाई केली गेल्याचा आरोप देखील उपरकर यांनी केला. त्या अमली पदार्थांमुळे तरुण पीढी वाया जात आहे. वाळू व्यवसायांमध्ये सत्ताधाऱ्यांचाच हाच आहे. मग कारवाईचे अपत्य निर्माण होण्यासाठी 9 महिने लागले ही खरी शोकांकित आहे. पोलीस अधीक्षक व पोलीस महासंचालकांना फोन करून खाजगीत सांगून कारवाई होत नाही. नाव व नंबर दिले तरी देखील पोलीस कारवाई करत नाही याचा अर्थ तुम्ही सक्षम पालकमंत्री नाही. राजापूर मध्ये सूर्यमंदिर या ठिकाणी मुस्लिम अतिक्रमण झाल्यामुळे हिंदू सभा घेण्याचे नियोजन पालकमंत्र्यांनी केलं होतं. पालकमंत्र्यांना घेण्यासाठी पोलीस पाऊस फाटा देखील राजापूर मध्ये थांबला होता. परंतु मुख्यमंत्र्यांचा दम आल्यावर पालकमंत्र्यांनी शेपटी घातली. असा टोला उपरकर यांनी लगावला. गृहराज्यमंत्री हे पालक मंत्र्यांना कसे दाबतात हे सुद्धा यातून दिसून आले. पालकमंत्री हे केवळ घोषणाबाजी करणारे वांझोट्या मीटिंग घेणारे असून विकासाचे आऊटपुट निघत नाही. त्यामुळे पालक मंत्र्यांनी राजीनामा द्यावा व दुसऱ्या पालकमंत्र्यांची नेमणूक करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे उपरकर यांनी सांगितले.
 
	




