सिंधुदुर्ग व्यापारी संघाचे उपाध्यक्ष कै. महेश नार्वेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिव्यांग शाळेमध्ये साहित्य वाटप

महेश नार्वेकर मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष कै. महेश नार्वेकर यांचे नुकतेच निधन झाले. नुकतात त्यांचा वाढदिवस होता. या वाढदिवसाच्या निमित्त महेश नर्वेकर मित्र मंडळाच्या वतीने कणकवली तालुक्यातील करंजे येथील दिव्यांग मुलांच्या शाळेत जाऊन शाळेला वॉटर डिस्पेन्सर व खाऊ वाटप, जेवण देण्यात आले. यावेळी गौरव गवाणकर, भालचंद्र नार्वेकर, रवींद्र बाणे, नवीन बांदेकर, मिंगेल मंतेरो, नारायण सवादे, महेश सावंत, अमित मयेकर, संदीप चिंदरकर, चंदन पाटील उपस्थित होते. यावेळी महेश नार्वेकर यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या समाजसेवी उपक्रमाचा वारसा पुढे चालवण्याचा निर्धार करण्यात आला.





