कणकवली चे पोलीस निरीक्षक अतुल जाधव निलंबित

मटका बुकी वर पालकमंत्र्यांचे धाड प्रकरण भोवले

पालकमंत्र्यांनी आजच पत्रकार परिषदेत दिला होता कारवाईचा इशारा

आता पुढचा नंबर कोणाचा? जनतेमध्ये चर्चा

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी काल कणकवलीतील मटका बुकी घेवारी याच्यावर कणकवली बाजारपेठेमध्ये धाड टाकल्यानंतर आज पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये याप्रकरणी जबाबदार पोलिसांवर कारवाई होणार असा इशारा दिला होता. या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज कणकवली चे काही दिवसांपूर्वीच रुजू झालेले पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे सिंधुदुर्ग पोलीस दलात देखील एकच खळबळ उडाली आहे. तसेच आज पत्रकार परिषदेत पालकमंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणी दोघे तिघेजण घरी जाणार असा इशारा दिला होता. त्यामुळे आता पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या नंतर पुढचा नंबर कोणाचा? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कणकवली शहरात मटका बुकी घेवारी याच्यावर कारवाई झाल्यानंतर याप्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला होता. पालकमंत्र्यांनी स्वतः मटका बुकि बसलेल्या ठिकाणी धाड टाकत ही कारवाई केली. मात्र यानंतर पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना ही माहिती दिल्यानंतर त्यांना घटनास्थळी पोहोचायला काही कालावधी लागला. ज्यांच्या कार्यक्षेत्रात अवैध धंदे व अनधिकृत व्यवसाय सुरू आहेत त्या अधिकाऱ्यांनी स्वतः कारवाई करावी अन्यथा मी त्या ठिकाणी पोचणार असे सांगत त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी आज सुचक इशारा दिला होता. व या इशाऱ्यानंतर या कारवाईत पहिला नंबर कणकवली पोलीस निरीक्षकांचा लागल्याने कणकवलीच्या पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!