कारवाईला वेळ देतोय, अन्यथा मी आठवड्याला ब्रेकिंग देणार!

पालकमंत्री नितेश राणेंचा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना इशारा
याद राखा, मला हलक्यात घेऊ नका, सोडणार नाही!
कणकवलीतील मटका जुगार अड्ड्यावर मी धाड टाकली. आता अवैध दारू धंदे, अंमली पदार्थाचे अड्डे, वाळू माफिया यांच्यावर कारवाईचा नंबर आहे. सर्व अवैध धंदे बंद न झाल्यास आम्ही दर आठवड्याला धाडसत्राची ब्रेकिंग न्युज देणार असा इशारा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला. तसेच या अवैध धंद्यांना पाठबळ देणारे पोलीस अधिकारी असो महसूल अधिकारी असोत किंवा अन्य शासकीय कर्मचारी या सर्व शासकीय अधिकाऱ्यांना आम्ही निलंबित करणार आहोत. त्यामुळे अवैध धंद्यांना पाठबळ देणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनी वेळीच सावध व्हावे असा इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी आज येथे दिला. येथील प्रहार भवन मध्ये श्री. राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते पुढे म्हणाले, मी पालकमंत्री पदाचा पदभार घेतल्यानंतर लगेचच जिल्ह्यातील मटका, जुगार, गांजा या अड्ड्यांवर कारवाई करावी असे निर्देश पोलीस प्रशासना दिले होते. त्यासाठी मी नऊ महिन्याची संधी दिली. पण पोलीस प्रशासन कारवाई करत नसल्याने मला धाड टाकावी लागली. राणे म्हणाले, सावंतवाडी रेस्ट हाऊसच्या मागे सिगारेट मधून कोण गांजा विकतोय, कोण कोण गांजा ओळख आहे ते. खारेपाटण चेकपोस्ट, कणकवलीतील हरकुळ बुद्रूक किंबहुना जिल्ह्यातील सर्वच भागात अवैध धंद्यांमध्ये कोण कोण सहभागी आहेत. या व्यावसायिकांना जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कशी साथ देतेय याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. एवढेच नव्हे तर मिडियातील कुणाकुणाचे अवैध व्यावसायिकांशी लागेबांधे आहेत. याचीही मला माहिती आहे. वेळ आल्यावर या सर्वांवर आम्ही कारवाई करणार आहोत. राणे म्हणाले, मी जिल्ह्यातील मटका, जुगार, गांजा या अवैध धंद्यांवर कारवाई करा असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यावेळी मला हप्ता मिळत नाही. हप्ता वाढवून पाहिजे असे अनेक आरोप झाले. पण मी गप्प राहिलो. कारण पोलिसांना कारवाईची संधी द्यायची होती. पण पोलिसांनी कारवाई केली नसल्याने मला धाड टाकावी लागली. काल मटका अड्ड्यावर धाड टाकली आणि प्रत्येक आठवड्याला सर्व अवैध व्यावसायांवर धाडसत्र टाकून ते व्यवसाय कायमचे बंद करून टाकणार आहे. राणे म्हणाले, सिंधुदुर्गातील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग, पोलीस, महसूल आणि इतर विभाग काय काय करतात. असा सवाल राणेंनी केला. वाळू चोरी, गांजा, गोवा बनावटीची दारू यांना कोण पाठबळ देतंय हे सर्व माहिती आहे. मी सगळ्यांना कारवाईसाठ वेळ देतोय. त्यांनी कारवाई करावी. कोणी निलंबित झाला तर मला दोष देऊ नका. नारायण राणे यांनी आपल्या कारकिर्दीत तरूणांना सुरक्षित ठेवले. व्यसनांच्या आहारी जाऊ दिले नाही. त्याचांचा मी मुलगा आहे हे सर्व अवैध व्यावसायिकांनी लक्षात ठेवावे. पालकमंत्री, पत्रकार आणि इतर सर्व शासकीय यंत्रणांनी आपली भूमिका चोख पार पाडायला हवी. अन्यथा युवा पिढी बाद झाल्याशिवाय राहणार नाही. हे सर्व थांबविण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांची आहे. सावंतवाडी रेस्ट हाऊसच्या मागे सिगारेट मधून कोण गांजा विकतायत. कोण – कोण गांजा ओढताहेत. खारेपाटण चेकपोस्ट, कणकवलीतील हरकुळ बुद्रूक तसेच जिल्ह्यातील इतर भागात अवैध धंद्यांमध्ये कोण – कोण सहभागी आहेत अवैध धंद्याना जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कशी साथ देतेय ? त्यात कोण कोण अधिकरी सहभागी आहेत ? कोणाला किती रक्कम दिली जाते ? धाड टाकण्यापूर्वी पूर्व कल्पना कोण देत ? याची सर्व माहिती आपल्याकडे पुराव्यासह उपलब्ध आहे. योग्य वेळी योग्य ती कारवाई करणार. तेव्हा मात्र कोणीही नोकरी गेली, घरी बसलो असे म्हणत रडत बसू नका, असा इशाराही ना. नितेश राणे यांनी दिला. पोलीस खात्यातील काही अधिकाऱ्यांनी असलेल्या रक्कमेपेक्षा डबल रक्कम वाढवून घेतली. त्या – त्या अधिकाऱ्यांची नावे, कोणत्या रंगाच्या इन्व्हलप, कोणत्या नोटा असतात ईथपर्यंत ची माहिती उपलब्ध आहे. परंतु मिळालेल्या संधित पोलीस यंत्रणा अवैध धंदे बंद करेल अशी अपेक्षा असताना मला स्वतःला पोलिसांना दखवुन द्यावं लागलं की, तुम्ही नाही म्हणत असलेल्या गोष्टी सुरू आहेत. कणकवली शहरात सुरू असलेल्या अवैध मटका बुकी वर टाकलेली धाड आणि पोलिसांचे उघडे पडलेले पितळ याला कारणीभूत आहे. त्यामुळे प्रत्येक आठवड्याला सर्व अवैध व्यावसायांवर धाडसत्र टाकून ते व्यवसाय कायमचे बंद करून टाकले जातील. खासदार नारायण राणे जेव्हा १९९० साली सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले तेव्हा त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख निर्माण केली. इथल्या तरुण तरुणींना रोजगार मिळावा या हेतूने येथे अनेक प्रकल्प होऊ घातले. त्यावेळी त्यांनी तरुण पिढीला व्यसनांच्या आहारी जाऊ दिले नाही. हे सर्व अवैध व्यावसायिकांनी लक्षात ठेवावे. पालकमंत्री, पत्रकार आणि इतर सर्व शासकीय यंत्रणांनी आपली भूमिका चोख पार पाडायला हवी. अन्यथा युवा पिढी बाद झाल्याशिवाय राहणार नाही. हे सर्व थांबविण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे, असेही ते म्हणाले.





