संत राऊळ महाराज महाविद्यालय मध्ये आज युवा महोत्सव

३९ स्पर्धांमधून जिल्ह्यातील ४२ महाविद्यालये सहभागी

मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने सिंधुदुर्ग विभागाचा ५८ वा युवा महोत्सव २२ व २३ ऑगस्टला संत राऊळ महाराज महाविद्यालय मध्ये होत आहे. संत राऊळ महाराज महाविद्यालयाने या महोत्सवाचे यजमानपद स्वीकारले असून या युवा महोत्सवासासाठी महाविद्यालय सज्ज झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४२ महाविद्यालये या युवा महोत्सवात सहभागी होतील. या युवा महोत्सव अंतर्गत विविध अशा ३९ स्पर्धा होणार आहेत.
शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ९.३० वाजता युवा महोत्सवाचे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमासाठी कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, सरचिटणीसआनंद वैद्य, सहसचिव महेंद्र गवस यांच्यासह प्रमुख पाहुणे सांस्कृतिक विभाग मुंबई विद्यापीठ समन्वयक डॉ. निलेश सावे, जिल्हा समन्वयक डॉ. आशिष नाईक, डॉ. नितीन वळुंजू हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन संत राऊळ महाराज महाविद्यालयात पूर्ण झाले असून उद्या विविध स्पर्धेचे आयोजन होणार आहेत. ज्यामध्ये भारतीय शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, तालवादन, तंतूवाद्य, पाश्चिमात्य संगीत, भारतीय पारंपरिक नृत्य, लोककला, वाङ्मय विभाग वक्तृत्व मराठी, हिंदी, इंग्लिश, वादविवाद स्पर्धा, अभिनय स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, विभागांतर्गत एकांकिका स्पर्धा, नाटुकली, फाईन आर्ट स्पॉट पेंटिंग मेकिंग, शिल्पकाम, एनवेळी विषय देऊन व्यंगचित्र, मेंदी , कोलाज असे विविध एकूण ३९ स्पर्धा प्रकारांच्या स्पर्धा होणार आहेत अशी माहिती सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. एम एम जांभळे यांनी दिली आहे. सहभागी विद्यार्थ्यांनी युवा महोत्सवातील सर्व महाविद्यालयाच्या स्पर्धक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या नियमावलीचे पालन करावे व महोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ .स्मिता सुरवसे यांनी केले आहे.

error: Content is protected !!