गणेश चतुर्थी काळात आचरा भागातील अवजड चिरे वाहतूक बंद ठेवा

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांची मागणी
गणेश चतुर्थी आणि इद च्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांनी गुरुवारी आचरा पोलीस स्टेशनला भेट देत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखत सण उत्सव आनंदाने साजरे करण्याचे आवाहन केले. यावेळी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आचरा तिठा येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी सरपंच जेरान फर्नांडिस यांनी केली. तसेच आचरा परीसरात सुरू असलेली अवजड वाहतूक चतुर्थी कालावधीत बंद ठेवण्याची मागणी उपस्थितांकडून करण्यात आली.
या बैठकीला पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार, सरपंच जेराॅन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परुळेकर ,परेश सावंत, ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर, चिरेखण व्यावसायिक दुर्गाप्रसाद तुळपुळे, तसेच फिरोज मुजावर, समीर मुजावर, ट्रॅव्हलर्स मालक दिनेश कांबळी ,उमेश बाणे यांसह पोलीस पाटील विठ्ठल धुरी, जगन्नाथ जोशी, दिनेश पाताडे, शांतता समिती मोहल्ला समितीचे सदस्य पोलीस कर्मचारी यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते यावेळी
सुरक्षेच्या दृष्टीने आचरा परीसरातील महत्वाचे भाग लवकरच सीसीटीव्ही च्या कक्षेत येणार असल्याचे पोलीस निरीक्षक पोवार यांनी सांगितले.





