पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आत्मनिर्भर प्रदर्शनाचे उद्घाटन

कुडाळ मध्ये नर्मदाआई संस्थेचे आयोजन
नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून कुडाळ येथे गणेशोत्सवानिमित्त आयोजित आत्मनिर्भर प्रदर्शन व खरेदी महोत्सवाचे उद्घाटन मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग नितेश राणे यांच्या शुभहस्ते शुक्रवारी दुपारी झाले. हे प्रदर्शन १७ ऑगस्ट पर्यंत महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे रोज दुपारी ३ वाजल्यापासून सुरू राहणार आहे.
आत्मनिर्भर प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी नर्मदाआई संस्थेच्या अध्यक्षा सौ.संध्या तेरसे, जिल्हा कार्यवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लवु म्हाडेश्वर, जिल्हा सरचिटणीस भाजपा रणजीत देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी उद्योजक प्रसाद तेरसे, संस्थेच्या सचिव श्रीमती दिप्ती मोरे, संचालिका श्रीमती जान्हवी मोरे, सौ. प्राजक्ता तेरसे, सौ.मृणाल देसाई, सौ.अक्षता कुडाळकर, सौ.अनुजा तेरसे, सौ.आरती पाटील, सौ.साधना माड्ये, सौ.तेजस्विनी वैद्य, सौ.विशाखा कुलकर्णी, भाजपा मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, रुपेश कानडे, पप्या तवटे, सुनिल बांदेकर, मोहन सावंत, सचिन काळप, माविम जिल्हा समन्वय नितीन काळे साहेब, तन्मय वालावलकर उपस्थित होते.




