गोपुरीत श्री सुहास पालव यांच्या हस्ते ध्वजारोहण

गोपुरी आश्रमाच्या सर्वच उपक्रमांना यापुढे देखील सहकार्य करणार
गोपुरी आश्रम वागदे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कणकवलीतील प्रथितयश सनदी लेखापाल सुहास पालव उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी गोपुरी परिवारातील श्री संदीप सावंत यांना 'व्ही. टी. पाटिल फाउंडेशन', कोल्हापूर यांचा 'परिवर्तन दूत' पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल व प्रा. डॉ. सुरेश पाटील यांचा पीएचडी प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे सुहास पालव यांनी सत्कार्थीना शुभेच्छा दिल्या. गोपुरीत राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांचा उल्लेख करून यापुढे आपणही भरीव योगदान देऊ अशी ग्वाही दिली. गांधी विचारांच्या या संस्थेत येऊन खूपच समाधान वाटल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. आश्रमचे अध्यक्ष प्रा डॉ.मुंबरकर यांनी प्रास्ताविक केले. सचिव बाळू मेस्त्री यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
यावेळी गोपुरीचे खजिनदार अमोल भोगले, सदाशिव कदम, राजेंद्र काळसेकर, सदाशिव कदम सतीश जाधव, नितीन तळेकर ,मुंबरकर मॅडम विनायक सापळे, सदाशिव राणे व गोपुरी कर्मचारी वृंद उपस्थित होता.




