पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज शेती संरक्षण शस्त्र परवान्यांचे वितरण होणार

प्रातिनिधिक स्वरूपात नऊ जणांना परवान्याचे वितरण
पात्र नवीन परवानाधारक व मृत व्यक्तींच्या वारसांना होणार वितरण
वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेती संरक्षण शस्त्र परवान्यांची परवानगी प्रक्रीया जिल्हा प्रशासनातर्फे नियमित केल्या जाते. शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे तसेच त्याच्या पिकांचे रक्षण व्हावे यासाठी पात्र शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनातर्फे नियमानुसार शस्त्र परवाना दिला जातो. या अनुषंगाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पात्र नवीन तसेच मृत पररवानाधारक व्यक्तींच्या वारसांना शेती संरक्षण परवान्यांचे वितरण करण्यात येणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात नऊ जणांना परवान्यांचे वितरण करण्यात येणार आहे. हे वितरण शासकीय ध्वजारोहणाच्या मुख्य समारंभ प्रसंगी पोलिस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्ग नगरी येथे होणार आहे.





