धोकादायक झाडे हटविण्यासाठी चिंदर येथील विनोद लब्दे यांचा

मालवण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा

वारंवार सुचना देवूनही आणि तंटामुक्त समिती, ग्रामपंचायत चिंदर यांना लेखी अर्ज करुनही घराला धोका निर्माण करणारी झाडे संबंधित मालक तोडत नसल्याने चिंदर लब्देवाडी येथील विनोद लब्दे यांनी मालवण तहसीलदार यांना निवेदन देत १५ ऑगस्ट पुर्वी झाडे न तोडल्यास मालवण तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. यात त्यांनी आपली आर्थिक परीस्थिती अतिशय बिकट असून आपल्या घरालगत शेजा-याच्या असलेली मालकीची आंबा, चाफा व पायरचे झाड आहे. या झाडांची पाळेमुळे आपल्या घराच्या भिंतीमध्ये गेली आहेत.त्यामुळे घराला धोका निर्माण झाला आहे. याबाबत चिंदर ग्रामपंचायत व तंटामुक्त समिती यांना ही निवेदन सादर केले. ती तोडण्याबाबत त्यांनी सुचनाही केल्या मात्र सदरील व्यक्तींने परीस्थिती नसल्याचे ग्रामपंचायतला लिहून दिले. सदरील व्यक्तीं हे मुद्दाम करत आहे अशी आपली खात्री असून आपण यावर निर्णय घेऊन गरीब माणसाचे घर वाचवावे.सदरील झाडे पंधरा ऑगस्ट पर्यंत तोडली न गेल्यास नाईलाजाने पंधरा ऑगस्ट ला आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा विनोद लब्दे यांनी निवेदनाद्वारे मालवण तहसीलदार यांना दिला आहे.

error: Content is protected !!