बोध होईल अशाप्रकारे कविता सादरीकरण करा – कवी अनंत वैद्य

संत राऊळ महाराज महाविद्यालयात ग्रंथपाल दिन आणि कविता वाचन स्पर्धा संपन्न

कविता सादर करताना इतरांना कवितेचा बोध मिळेल अशा प्रकारे कविता सादर करावी असे आवाहन कवी आनंद वैद्य यांनी केले. येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये ग्रंथालय विभाग व वाङ्मचर्चा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथपाल दिन आणि कविता वाचन स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या निमित्ताने वाङ्मचर्चा मंडळाच्या वतीने कविता वाचन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेमध्ये एकूण एकवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, आणि इंग्रजी भाषांमध्ये कविता सादर केल्या.
या कार्यक्रमाला कराची महाराष्ट्रीयन शिक्षण प्रसारक मंडळाचे सरकार्यवाह, कवी आनंद वैद्य यांच्यासह कवी राजेंद्र गोसावी, प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, डॉ. प्रा. शरयू आसोलकर व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जन्म दिन ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने वाङ्मचर्चा मंडळाच्या वतीने कविता वाचन स्पर्धा घेण्यात आली.स्पर्धेमध्ये एकूण एकवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, आणि इंग्रजी भाषांमध्ये कविता सादर केल्या.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कवी अनंत वैद्य म्हणाले, कविता सादर करताना इतरांना कवितेचा बोध मिळेल अशा प्रकारे कविता सादर करावी. त्याचबरोबर कविता लिहिण्यापूर्वी अगोदर जे कवी आहेत त्यांच्या कविता वाचल्या पाहिजेत आणि कविता सादरीकरण करत असताना नाट्य स्वरूपातही रसिकांसमोर कविता सादर कराव्यात. त्याचबरोबर कविता सादर करत असताना आपल्या आवाजावर काम करावे असेही त्यांनी या ठिकाणी सांगितले. ज्याप्रमाणे एखादा कारागीर दगडापासून पुतळा बनवत असतो, त्याने फक्त दगडातील अनावश्यक भाग काढून टाकलेला असतो. अगदी त्याच प्रकारे कविताही असते आणि त्याच्यातून अनावश्यक भाग काढून टाकल्यानंतर एक सुंदर अशी कविता तयार होते याकडे त्यांनी लक्ष वेधले.
कवी राजेंद्र गोसावी यांनी कवितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर आपले मनोगत व्यक्त केले. पहिल्या कवितेतून त्यांनी शाळेची आठवण कशाप्रकारे अजूनही राहिलेली आहे हे सांगितले. तसेच दुसरी कविता मालवणी भाषेतून त्यांनी मांडली. कवी बनण्यासाठी असलेली प्रतिभा ही उपजत असते असेही त्यांनी आपल्या मनोगतात म्हटले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांनी आपल्या मनोगतातून कविता वाचनाचा आनंद विद्यार्थ्यांनी घेण्याचे आवाहन केले.कविता सादर केलेल्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले. तसेच त्यांनी देखील एक प्रेरणादायी कविता विद्यार्थ्यांसमोर सादर केली.
इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ.व्ही.जी.भास्कर यांनी डॉ.एस. आर. रंगनाथन यांच्या जीवनाबद्दल थोडक्यात माहिती दिली. काव्य वाचनाचे महत्त्व, अर्थ समजून घेऊन नवीन विषयात कविता लिहिण्याचे आवाहन आपल्या मनोगतातून प्रा.डॉ.मंगेश जांबळे यांनी विद्यार्थ्यांना केले. प्रा. डॉ.आर.वाय.ठाकूर यांनी कवयित्री डॉ.शरयू आसोलकर यांच्या एका कवितेचे अभिवाचन केले.
कविता वाचनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. स्पर्धेचे परीक्षण प्रा. संतोष वालावलकर यानी केले. ग्रंथपाल डॉ. एस. एस. लोखंडे यांनी कार्यक्रमाचे औचित्य स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भारत तुपेरे यांनी केले. कार्यक्रमाचा अगदी थोडक्यात अढावा घेत मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. शरयू आसोलकर सर्वांचे आभार मानले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी कुमारी तनू कुमावत हिने केले. कॅप्टन डॉ. एस. टी. आवटे, डॉ. आर. वाय. ठाकूर, डॉ. प्रमोद जमदाडे आदी प्रध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.

error: Content is protected !!