सरंबळ हायस्कुलमध्ये रोटरीकडून आयडीयल स्टडी ॲपचे वितरण

रोटरी क्लब ऑफ कुडाळचा उपक्रम

सरंबळ इंग्लिश स्कूल सरंबळ येथील इयत्ता दहावीच्यी विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून ‘आयडीयल स्टडी ॲप’ चे वितरण करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष रो. राजीव पवार , विशेष उपस्थिती असिस्टंट गव्हर्नर रो. सचिन मदने, रो. डी. के. परब, इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ अध्यक्षा सौ. सानिका मदने, पीडीसी डॉ. सायली प्रभू, सचिव सौ. सई तेली, आयएसओ सौ. मेघा भोगटे, सौ. शिल्पा बिले, सौ. स्वप्नाली साळगावकर व सौ. प्रिती तायशेटये ,उपसरपंच सागर परब व मुख्याध्यापक श्री अनिल होळकर, शिक्षकवृंद , तसेच माजी विद्यार्थी मंडळाचे सदस्य मॅक्सी फर्नांडिस, संदिप परब, प्रसाद साटम, संस्था कमिटी अध्यक्ष जयप्रकाश गावडे ,आदी उपस्थित होते.
यावेळी माजी विद्यार्थी मंडळाचे प्रतिनिधी मॅक्सी फर्नांडिस यांनी आपल्या मनोगतातून शाळेबद्दलच्या आठवणींना उजाळा देत शिक्षकवर्ग व संस्थेच्या प्रगतीस शुभेच्छा दिल्या. आयडीयल स्टडी ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचे साधन उपलब्ध करून देत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना मिळाली.
आयडीयल स्टडी ॲप हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरक असल्याचे असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने यांनी व्यक्त केले. हे ॲप वापरायचे कसे याबाबतची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.
प्रास्ताविक मुख्याध्यापक अनिल होळकर, सूत्रसंचालन सहशिक्षक संदिप परब तर आभार सौ होळकर मॅडम यांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!