कणकवली येथे १० रोजी भालचंद्र चषक कबड्डी स्पर्धा

भालचंद्र मित्र मंडळ कणकवलीच्या वतीने आयोजन

भालचंद्र मित्रमंडळ, कणकवलीच्यावतीने रविवार १० ऑगस्ट रोजी विद्यामंदिर प्रशालेच्या पटांगणावर ‘भालचंद्र चषक २०२५’कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रोख रुपये दहा हजार व चषक, द्वितीय क्रमांकास सात हजार रुपये व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकास प्रत्येकी दीड हजार रुपये व चषक देवून गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अष्टपैलू खेळाडूस एक हजार रुपये व चषक, उत्कृष्ट पकड सातशे रुपये व चषक, उत्कृष्ट चढाई सातशे रुपये व चषक अशी वैयक्तिक स्वरुपातील बक्षिसे आहेत. कबड्डीप्रेमींनी ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.तसेच अधिक माहितीसाठी दीपक देऊळकर ९४०४९०१५८५ व रूचिर ठाकूर ९५५२२२१२७६ यांच्याशी संपर्क साधायचा आहे.

error: Content is protected !!