आचरा दिंडी मंडळाचा पुणे येथे डंका

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्व पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे आयोजित कार्यक्रमात सादर केली कला.
समाज परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करत पारंपरिक लोककलांचा अनोखा कार्यक्रम सादर करत पुणे येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन परवा निमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे आयोजित विविध कार्यक्रमात आचरा येथील दिंडी मंडळाने आपल्या दिंडी कार्यक्रमाने रंगत आणली.दिंडी भजनासह विविध थोर व्यक्ती रेखांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. निगडीतील अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरात प्रबोधन पर्व आयोजित केले होते.
यात विविध लोककलांचे आयोजन महापालिकेतर्फे करण्यात आले होते.जगतगुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज मराठी मावळे आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्वामी समर्थ यांच्या व्यक्तिरेखा सादर करत आचरा येथील विठ्ठल रखुमाई दिंडी मंडळाने रसिकांना मंत्रमुग्ध केले .या दिंडी भजन मंडळच्या ६५ कलाकारांनी सहभाग घेतला होता. पारंपरिक वेशभूषा टाळ मृदंगाचा गजर भक्ती गीत अभंग गाणे आणि विठ्ठल नामाचा जयघोष करत भगव्या पथका फडकवित भजनाच्या सुरांनी वातावरण भारून गेले होते.





