मालवण तालुकास्तरीय कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धेत जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेचे घवघवीत यश

कट्टा हायस्कूल कट्टा येथे झालेल्या कॅरम स्पर्धेत जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेच्या आठ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. यात 14 वर्षाखालील मुली कु.रेवा पाटील -प्रथम क्रमांक, ईश्वरी त्रिंबककर- द्वितीय क्रमांक
17 वर्षाखालील मुली तृप्ती राऊळ -द्वितीय क्रमांक, अनन्या त्रिंबककर- चतुर्थ क्रमांक श्रुतिका साईल -पाचवा क्रमांक
१७ वर्ष मुलगे नैतिक त्रिंबककर -द्वितीय क्रमांक, स्वराज लोके -तृतीय क्रमांक वेदांत तावडे- सहावा क्रमांक वराड हायस्कूल मालवण येथे झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलींमध्ये कुमारी सेजल राऊत या विद्यार्थिनीची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष अण्णा सकपाळ सचिव अरुण घाडी सर्व संचालक मुख्याध्यापक प्रविण घाडीगांवकर सर्व शिक्षक पालक आणि ग्रामस्थांनी अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या.क्रीडा शिक्षक महेंद्र वारंग सर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.





