व्यसनाची होळी करूया, सकारात्मक परिवर्तन घडवूया: प्रमोद लिमये

व्यसनमुक्ती विषयावर मार्गदर्शन करताना व्यक्तव्य
व्यसन म्हणजे शरीर, मन आणि आयुष्य यांचा नाश करणारा मार्ग आहे. व्यसन हे केवळ वैयक्तिक नव्हे तर कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्याचे ही नुकसान करते. म्हणून आपण सर्वांनी व्यसनाची होळी करूया सकारात्मक परिवर्तन घडवूया असा संदेश रोटरी क्लब कणकवलीचे रोटरियन प्रमोद लिमये यांनी दिला. ते वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाच्या डॉ. एम. डी. देसाई सांस्कृतिक भवनात रोटरी क्लब कणकवलीच्या वतीने व्यसनमुक्ती मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी रोटरी क्लब कणकवलीचे रोटरीयन महेंद्र
मूरकर, लऊ पिळणकर, कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्राचे
अधिक्षक संजय सावंत, प्राचार्य अविनाश मांजरेकर, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारीवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
व्यसनामुळे आर्थिक हानी बरोबरच चोऱ्या आणि गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे आत्तापासूनच जागे व्हा, भविष्यात प्रत्येकाने व्यसनांपासून दूर राहून व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प करूया, असे प्रतिपादन प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे सहा.शिक्षक सचिन शेटये व आभार संजय सावंत यांनी मानले.





