खारेपाटण पंचक्रोशीतील महिलांसाठी १४ ऑगस्ट रोजी मोफत देवदर्शन सहल

खारेपाटण तालुका कृती समिती व रोटरी क्लब ऑफ खारेपाटण आणि समाजसेवक रुपेश सावंत यांचे आयोजन
खारेपाटण तालुका निर्मिती कृती समिती व रोटरी क्लब ऑफ खारेपाटण यांच्या वतीने तसेच खारेपाटण गावचे सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते तथा डोंबिवली, मुंबई येथील युवा उद्योजक व समाजसेवक श्री. रुपेश सावंत यांच्या सौजन्याने पवित्र अशा श्रावण महिन्याचे औचित्य साधून दी. १४ ऑगस्ट २०२५ रोजी खारेपाटण पंचक्रोशीतील महिला भगिणीसाठी मोफत देवदर्शन वर्षा सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक कार्यकर्ते श्री. रुपेश सावंत हे दरवर्षी येथील महिला भगिनीसाठी मोफत देव दर्शन सहलीचे आयोजन करत असून यावर्षी श्री. सावंत यांनी श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर व श्री शेत्र ज्योतिबा कोल्हापूर व श्री शेत्र बाळूमामा मंदिर आदमपुर आदी पवित्र अशा धार्मिक स्थळांच्या ठिकाणी मोफत देव दर्शन एक दिवसीय वर्षा सहलीचे आयोजन केले असून एकूण या सहली दरम्यान सर्व सहभागी महीलाना मोफत प्रवास, नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
तरी या मोफत देवदर्शन वर्षा सहलीसाठी ज्या महिलांना सहभाग घ्यावयचा आहे त्यांनी आपली नाव नोंदणी श्री. सुबोध विजय देसाई – ९४२३८९०८२६ यांचे कडे करावी. तरी या मोफत देव दर्शन वर्षा सहलीसाठी खारेपाटण पंचक्रोशीतील जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा. असे आवाहन सहलीचे आयोजक व खारेपाटण तालुका कृती समितीचे अध्यक्ष श्री रमाकांत राऊत व रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे अध्यक्ष श्री दयानंद कोकाटे यांनी संयुक्तिक केले आहे.





