रामेश्वर वाचन मंदिर चा चोखंदळ वाचक पुरस्कार नारायण मिराशी यांना प्रदान

वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आले वितरण
आचरा-अर्जुन बापर्डेकर
रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिर तर्फे मारुती आचरेकर स्मरणार्थ ऍड सायली आचरेकर पुरस्कृत देण्यात येणारा या वर्षीचा चोखंदळ वाचक पुरस्कार जेष्ठ वाचक नारायण रामचंद्र मिराशी यांना प्रदान करण्यात आला.
रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिरच्या १३१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष बाबाजी भिसळे उपाध्यक्ष अशोक कांबळी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.यावेळी संस्थेचे कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, उर्मिला सांबारी,श्रीमती वैशाली सांबारी, दिपाली कावले, जयप्रकाश परुळेकर, भिकाजी कदम, विरेंद्र पुजारे, साहित्यिक सुरेश ठाकूर, वैभवशाली पतसंस्था चेअरमन मंदार सांबारी, जेष्ठ वाचक चंद्रकांत घाडी, सुभाष सांबारी, तसेच राजा जोशी, सौ उज्वला सरजोशी, मंदार सरजोशी, ग्रंथपाल विनिता कांबळी सांस्कृतिक समितीचे वर्षा सांबारी, कामिनी ढेकणे, विलास आचरेकर, नरेंद्र कोदे, कर्मचारी वर्ग यांसह बहुसंख्य वाचक विद्यार्थी उपस्थित होते. या सभेची सुरुवात उपाध्यक्ष अशोक कांबळी यांच्या प्रास्ताविकेने झाली. या वेळी बोलताना अध्यक्ष बाबाजी भिसळे यांनी संस्थेच्या प्रगतशील वाटचालीचा आलेख मांडताना इ वाचनालयासाठी अपु-या जागेमुळे आवश्यक विस्तारीत इमारतीबाबत सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. संस्थेचे सभासद सुरेश ठाकूर, मंदार सांबारी, चंद्रकांत घाडी, मंदार सरजोशी यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीबाबत गौरवोद्गार काढले. सुत्रसंचालन विनिता कांबळी यांनी तर आभार अर्जुन बापर्डेकर यांनी मानले.

error: Content is protected !!