किर्लोस कृषी विज्ञान केंद्राद्वारे किसान सन्मान निधी वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

पी एम किसान सन्मान निधी वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण
पी एम किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता जमा
पी एम किसान सन्मान निधी शेतकऱ्यांचा आधारस्तंभ
पी एम किसान सन्मान निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
किर्लोस कृषी विज्ञान केंद्र आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय ओरोस येथे करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार मध्ये वाराणसी येथील देशपातळीवरील मुख्य कार्यक्रमात डीबीटी द्वारे 9 कोटी 80 लाखाहुन अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 वा हप्ता जमा करण्यात आला. 2500 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरळ हस्तांतरित करण्यात आले. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकार दरवर्षी 6000 रुपये तीन हप्त्यात शेतकऱ्यांना देत आहे. त्यामुळे त्याला शेतीच्या कार्यात मदत होत आहे. त्याचा मला आनंद होत आहे असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. शेती करिता हा निधी शेतकरी वापरतील त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांचे कल्याण होईल असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
कृषी प्रतिष्ठान किर्लोसे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख बाळकृष्ण गावडे यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या उपक्रमांची माहिती शेतकऱ्यांना दिली. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा श्रीमती भाग्यश्री नाईकनवरे कार्यक्रमास उपस्थित होत्या. कृषी विभागाचे उपसंचालक ज्ञानेश्वर बढे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ भास्कर काजरेकर, डॉ विलास सावंत, विकास धामापूरकर, सुयश राणे अधिकारी मंगेश पालव, नरेंद्र सावंत, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिद्धेश भेंडे, प्रा. प्रसाद ओगले, महेश परुळेकर, तालुका कृषी अधिकारी श्रीम. माधुरी राऊत, मंडळ कृषी अधिकारी डी एस सगरे, विजय घोंगे, उप कृषी अधिकारी श्रीम. गीता परब, श्रीम. साक्षी परब, श्रीम. मनीषा पाटील, कृषी सेवक श्रीमती एस पी सामंत उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा होत नाही अशा शेतकऱ्यांच्या नोंदी घेऊन मदत करण्यात आली. 200 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.





