दारू वाहतूक करणारा ट्रेलर वैभववाडी पोलिसांच्या ताब्यात

करूळ चेक नाका येथे वैभववाडी पोलिसांची कारवाई
वैभववाडी तालुक्यातील करूळ चेक नाका येथे दारू वाहतूक करणारा ट्रेलर पोलिसांनी ताब्यात घेतला असून. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास करूळ चेक नाका येथे ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस ठाणे वैभववाडी यांना तात्काळ घटनेची माहिती मिळताच. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने,पोलीस हवालदार रंजित सावंत,पो. कॉ -लक्ष्मीप्रसाद हाके,पो. कॉ -समीर तांबे,यांनी ट्रेलर चा पंचनामा करण्यात केला. हा ट्रेलर वैभववाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आला असून दारूच्या बॉटल व बॉक्स मोजण्याचे काम सुरु आहे. या घटनेचा अधिक तपास वैभववाडी पोलीस करीत आहेत.





