बेनामी ठेकेदाराच्या छत्रछायेखाली सर्वेश दळवी यांचे काम

युवा सेना शाखाप्रमुख विजय गावकर यांचा टोला
भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी सर्वेश दळवी यांचे अस्तित्व बेनामी ठेकेदाराच्या छत्राखाली आहे. बेनामी ठेकेदाराने त्यांचाच वडिलांचे राजकीय अस्तित्व संपवले. उत्तम लोके यांचा वर टीका करताना आपली राजकीय आणि ठेकदारी पातळी तालुक्यामध्ये सर्व स्त्रुत आहे. त्यामुळे उत्तम लोके यांच्यावर टीका करतेवेळी आपली पातळी काय व किती आहे हे विसरू नये अशा शब्दात युवा सेना शाखाप्रमुखसमाचार विजय गावकर यांनी टोला लगावला आहे.
उत्तम लोके यांनी केलेल्या टीकेची झळ एवढी लागली की पूर्ण फुगागट आंगडोंब झाला. सत्य कटू असते हे यावरून त्यांनी स्वतः मान्य केले. आणि यावर सर्वेश दळवी यांनी आपण आपल्या फुगा भरणाऱ्या फुगे वाल्याला कस खुश करायचं तर उत्तम लोके यांच्यावर टीका करून दाखवलं. आपली पातळी नसलेला ठेकेदार नाटळ पंचक्रोशीतील जलजीवन ची कामे अर्धे सोडून पळ काढणारा ठेकेदार अशी याची ख्याती हे उत्तम लोके यांच्यावर काय बोलणार .
जल जीवन मिशन नळयोजना अर्धे सोडून पळ काढणाऱ्या सर्वेश दळवी ला जिल्हा परिषद शाळा दारिस्ते न.1 येथे ग्रामस्थ नळ योजनेच्या विषयावर काय घडले होते व त्यावेळी उत्तम लोके यांनी त्यांचे बचाव कार्य केले होते. हे सर्वेश दळवी याची जाण ठेवावी.
सरकारी कामे घेऊन लोकांना विकून आपला उदरनिर्वाह करणारे उत्तम लोके यांच्यावर टीका करतात हाच मोठा जोक आहे असा सणसणीत चपराक विजय गावकर यांनी दिली.
बेनामी ठेकेदार व सब ठेकेदारीमुळे जे काही घडले आहे ते वेळ पडली तर व्हिडिओ आणि ऑर्डओ पुराव्यासहित जग जाहीर करू शकतो. असा इशारा त्यांनी दिला आहे.
उत्तम लोके जे काही पालकमंत्रांवर बोलले ते सर्वेश दळवी यांच्या कामावरून पूर्ण तालुक्याला दिसून आलेले आहेत.पालकमंत्र्यांची नीतिमत्ता काय आहे हे आम्हाला पुराव्यानिशी जग जाहीर करता येईल.असा इशारा युवासेना शाखाप्रमुख विजय गावकर यांनी दिला आहे.





