वामनराव महाडिक विद्यालयात करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न

आपल्या यश अपयशाला आपणच जबाबदार असतो, कारण तेवढी समज आपल्याला तरुणपणात येत असते. मार्ग योग्य असला तरच तो स्वतः त्याच्या यशाचा मार्ग रचतो असे प्रतिपादन प्रख्यात करिअर मार्गदर्शक वंदना नागरगोजे यांनी कार्यक्रमात बोलताना केले, त्या वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय येथील डॉ. एम. डी. देसाई सांस्कृतिक भवनात करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होत्या. श्री विठ्ठल रखुमाई मंदिर समिती ओझरम- तीर्थवाडी यांच्या विद्यमाने विद्यालयातील इयत्ता 9वी ते 12वी च्या सर्व शाखा ..या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन बद्दल सखोल माहिती देण्यात आली.
यावेळी मुंबई येथील प्रख्यात करिअर मार्गदर्शिका सौ वंदना नागरगोजे, गोपीनाथ नागरगोजे, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र राणे, श्री. विठ्ठल रुखूमाई मंदिर समिती सदस्य बाबू राणे, श्री व सौ. मदभावे, निलेश सोरप, प्राचार्य अविनाश मांजरेकर, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी वृंद, उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना भविष्यातील करियर मार्गदर्शनामध्ये येणाऱ्या समस्यांचे निराकरण नागरगोजे मॅडम यांनी केले. तसेच त्यांच्या कडील सखोल ज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांसाठी करिअर संबंधित होतोय हे आमचे भाग्यच आहे असे प्रतिपादन प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी केले. इयत्ता 9वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या क्षेत्रात कोणकोणत्या संधी लागतात याचे सखोल मार्गदर्शन वंदना नागरगोजे यांनी कार्यक्रमादरम्यान केले ,तसेच विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन हे प्रश्न उत्तरांच्या चर्चेदरम्यान करण्यात आले. त्यामुळे मुलांमध्ये असणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरे उलगडली. व त्यांना आत्मिक समाधानाबरोबरच आत्मविश्वास जागा करण्याचे काम या मार्गदर्शनामुळे झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक सचिन शेटये यांनी केले.