सावडाव मधील एसटी फेऱ्या नियमित करा अन्यथा आंदोलन छेडणार!

सावडाव ग्रामस्थ व शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने एसटी अधिकाऱ्यांना निवेदन

सावडाव हे गाव कणकवली मुख्य शहरापासून लांब असून तसेच याठिकाणी एसटी व्यतिरिक्त दळणवळणाच्या इतर सोयीसुविधा नाहीत. या गावात दिवसभरात जेमतेम ४ बसफेऱ्या सुरु आहेत. सुरु असलेल्या एसटी बसफेऱ्या देखील नियमित वेळेत येत नसल्याने सावडाव गावातून कणकवली येथे शाळा, कॉलेज मध्ये ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच कामानिमित्त प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही बसफेऱ्या वेळेत सोडल्या जात नाहीत.
तरी पुढील ७ दिवसांत सदर विषयास अनुसरून आपण स्वतः लक्ष घालून एसटी बसफेऱ्या सुरळीत करून विद्यार्थी व कामानिमित्त कणकवली व इतर ठिकाणी प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांची गैरसोय टाळावी. तसेच आपण केलेल्या कार्यवाही बाबतची लेखी माहिती मला देण्यात यावी. असे निवेदन माजी आमदार वैभव नाईक यांचे सावळा व ग्रामस्थांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. अन्यथा सावडाव येथील विद्यार्थी व ग्रामस्थांसमवेत आपल्या कार्यालयावर आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला. याप्रसंगी शिवसेना उबाठा तालुका प्रमुख कन्हैया पारकर, राजू राठोड, सामाजिक कार्यकर्त्या सौ. नयना सावंत , ग्रा.पं. सदस्य अजय जाधव, सावडाव शाखाप्रमुख संदीप वारंग , रवींद्र खांदारे, सुहास पाताडे, वैभव सावंत आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!