कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची मुख्यकार्यकारी यांच्या सोबत सहविचार सभा संपन्न

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची सहविचार सभा शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या सभागृहात कास्ट्राईब महासंघाचे राज्य महासचिव सुरेश तांबे आणि कास्ट्राईब कर्मचारी महासंचाचे जिल्हाध्यक्ष समाजभुषण संदीप लहु कदम यांच्या प्रमुख उपस्थित मुख्यकार्यकारी अधिकारी सन्मा. रविंद्र खेबुडकर यांनी सहविचार सभा घेतली. सदरवेळी सहाय्यक प्रशासन अधिकारी आनंद राणे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे ,आरोग्य अधिकारी डॉक्टर सई धुरी , माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी ,विठोबा परब ,प्राथमिक शिक्षणाधिकारी चे प्रतिनिधी व इतरखातेनिहाय प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते . सदर सहविचार सभेत डिसेंबर 2024 पर्यंतचा अनुशेष , पदोन्नती आणि अनुकंपा भरती बाबत कास्ट्राईब संघटनेच्या वतीने सद्यस्थिती बाबत माहिती घेतली. तसेच निलंबन प्रकरणांबाबत ,अधिसंक्य पदांबाबत तसेच तीन डिसेंबर 1980 च्या शासन निर्णयाच्या अंमलबजावण्या बाबत आढावा मागितला. शिक्षण विस्तार अधिकारी पदोन्नती बाबत, रिक्त कर्मचारी भरती बाबत ही कास्ट्राईब संघटनेने प्रश्न उपस्थित केले सदर बाबतीत संघटनेला मुख्यकार्यकारी यांनी समाधानकारक माहिती दिली. सदरवेळी खातेनिहाय कास्ट्राईब जिल्हा शाखांनी आपल्या प्रश्नांबाबत विचारणा करुण प्रश्नांची उकल केली. ग्रामसेवकांची सेवा जेष्ठता यादी तालुका निहाय तयार करण्यात यावी. ग्रामपंचायत अधिकारी यांना दरवर्षी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देताना त्यांना सर्व विषयांचे सर्वोत्कृष्ट कामाच्या आधारे पुरस्कार द्यावा त्यामध्ये कोणाही संघटनेचा हस्तक्षेप असू नये असे केल्याने ग्रामसेवक कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होतो कास्ट्राईब संघटनेच्या वतीने कोणत्याही खात्यातील कर्मचाऱ्याला एक वर्षा पेक्षा जास्त दिवस निलंबन असेल तर त्या कर्मचाऱ्या ला तात्काळ सेवेत सामावून घ्यावे तसेच किती कर्मचाऱ्यांना निलंबित आणि बडतर्फ करण्यात आले आहे अशी विचारणा कास्ट्राईब संघटनेच्या वतीने करण्यात आली. सदर बाबतीत मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी विस्तृत माहिती दिली. सप्टेंबर 2024 मध्ये ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी ही दोन्ही पदे विसर्जित करून ग्रामपंचायत अधिकारी हे एकच पद निर्मिती केल्यानंतर मागील लाभ देऊन त्या वेळेपासून ग्राम मध्ये अधिकारी यांची प्रत्यक्ष वेतन निश्चिती करण्यात यावी तसेच ग्रामपंचायत अधिकारी यांचे 10 -20 -30 चे प्रस्ताव वेळेत पूर्ण करून द्यावेत .
अजित कुमार विष्णू देठे यांची सेवा जेष्ठता डावलून संस्थेने चुकीच्या पद्धतीने मुख्याध्यापक नियुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे त्या ठिकाणी कायद्याप्रमाणे मुख्याध्यापक नियुक्त व्हावा सेवाजेष्ठते प्रमाणे देठे सर यांना कोर्टाच्या अधिन राहुन मुख्याध्यापक नियुक्ती द्यावी तसेच सदर अन्याविरुद्ध देठे सर हे कोर्टात गेलेले आहेत मात्र संस्था बेकायदेशीरपणे काम करत आहे. त्या बाबतीत नियमाने व एसएस कोड प्रमाणे माध्यमिक प्रशासनाने खंबीरपणाने उभे राहावे अशी मागणी कास्ट्राईब च्या वतीने करण्यात आली. त्यावेळी शिक्षणाधिकारी कविता शिंपी मॅडम यांनी नियमबाह्य कोणती गोष्ट मान्य केली जाणार नाही असे सांगितले. भीमराव येडगे देवगड हायस्कूल यांना पर्यवेक्षक पदी डावलण्याचा प्रयत्न केला जात आहे तरी त्या बाबतीत संबंधित संस्थेला लेखी कळवावे असे कास्ट्राईब संघटनेच्या वतीने सांगण्यात आले तसेच सौ. अनुष्का नागेश कदम बिळवस हायस्कूल यांना वरिष्ठ वेतन श्रेणी कोर्टांच्या अजून राहून देण्यात येईल असे सांगण्यात आले. नचिकेत पवार यांना अनुकंपा नियुक्ती बाबत संस्थेला वारंवार कळविले आहे. तरि संस्था प्रशासनावर तात्काळ कारवाई करावी असे कास्ट्राईब संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना सांगण्यात आले.
कास्ट्राईब प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीनेजुनी पेन्शन प्रस्ताव मंजूर करण्यात यावे. नवभारत अभियानासाठी स्वतंत्र खाती काढण्यासाठी सक्ती करण्यात येत आहे. देवगड तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणीचा फरक एनपीएस खाते नसल्यामुळे दिला जात नाही या बाबतीत तात्काळ लक्ष घालण्यात यावा. तसेच केंद्रप्रमुख जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने पदोन्नतीने सदर पदे भरण्यात यावीत. तसेच ऑनलाईन कामकाज शालेय पोषण आहार व शिक्षकांच्या BLO ऑडरी संदर्भात चर्चा करण्यात आली. पर्यवेक्षिका कास्ट्राईब संघटनेच्या वतीने महाराष्ट्र विकास सेवा गट ब ची पदोन्नती करताना जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका यांना निवड सूची मध्ये स्थान देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली असता सदर बाबतीत प्रक्रिया चालु असल्याचे सांगण्यात आले. तसेच जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका यांना 25 वर्षात किती वेळा पदोन्नतीने सामावून घेतले याबाबत खातरजमा करून विस्तार अधिकारी (सां) प्रमाणे कोटा देऊन मागील अनुशेष भरण्यास कास्ट्राईब पर्यवेक्षिका संघटनेचे वतीने विनंती करण्यात आली. मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या सदर सभेआधी माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांचे सोबत सभा झाली सदर सभेत कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सर्वच विषय निकाली काढले. व चांगले सहकार्य केले तसेच आरोग्य अधिकारी डॉ. धुरी मॅडम यांनीही चांगले सहकार्य करून अनेक प्रश्न निकाली काढले या बाबत मुख्यकार्यकारी अधिकारी सन्मा. रविन्द्र खेबुडकर साहेब यांनी दोघींचे ही खास सर्व अधिकारी व कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या सर्व पदाधिकारी समक्ष पुष्पगुच्छ देवुन अभिनंदन केले. सदर वेळीकास्ट टाईप कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम जिल्हा महासचिव किशोर कदम, लक्ष्मण घोटकर कोकण विभाग सचिव माध्यमिक संघटना जिल्हाध्यक्ष संजय पेंढुरकर महासचिव अभिजीत जाधव प्राथमिक संघटना जिल्हाध्यक्ष विकास वाडीकर महासचिव मनोज अटक ग्रामसेवक संघटना जिल्हाध्यक्ष मंगेश साळस्कर सचिव प्रशांत जाधव वंजारे एम एस, पर्यवेक्षिका राखी राणे आदिंसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते शेवटी आभार किशोर कदम यांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!