चिंदर कुंभारवाडी शाळेत बरसल्या स्वर धारा

भक्ती गीत गायन स्पर्धेत गार्गी मुणगेकर प्रथम
आचरा–अर्जुन बापर्डेकर
जिल्हा परिषद शाळा चिदर कुंभारवाडी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक जानेवारी 2025 पासून प्रत्येक महिन्याला एक याप्रमाणे विविध उपक्रमांचे आयोजन करत आहे. जुलै महिन्यात विद्यार्थ्यांसाठी भक्ती गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेसाठी श्री. गोपाळ जिकमडे यांनी बक्षीस रुपाने तर श्री. विकास पारकर यांनी सन्मानचिन्हे व श्री. चंद्रकांत चिंदरकर यांनी प्रशस्तीपत्रके उपलब्ध करून दिली. स्पर्धेसाठी शाळेचे माजी विद्यार्थी श्री. सोहम चिंदरकर संवादिनी तर वेदांत चिंदरकर यांची सुरेख पखवाज साथ लाभली.
विद्यार्थ्यांच्या उत्तरोत्तर रंगत गेलेल्या संगीत मैफिलीने पालक व रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. या स्पर्धेचे परीक्षण आचरा गावचे प्रसिद्ध भजनी बुवा श्री. मंदार आचरेकर यांनी पाहिले. या स्पर्धेत कु. गार्गी उमेश मुणगेकर प्रथम, नक्षत्रा स्वप्नील चिंदरकर द्वितीय तर गंधर्व नारायण चिंदरकर याने तृतीय क्रमांक पटकावला.
उत्तेजनार्थ कुमार कौस्तुभ पावसकर याला गौरविण्यात आले. शाळेचे माजी विद्यार्थी कु.सोहम चिंदरकर कु. वेदांत चिंदरकर कु. श्रीकांत चिंदरकर यांनी सुद्धा भक्ती गीत गायन केले. स्पर्धेचे बक्षीस वितरण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. नारायण चिंदरकर पोलीस पाटील सौ.स्वरा चिंदरकर ,जेष्ठ नागरिक चंद्रकांत चिंदरकर, श्री. सुहास चिंदरकर आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य कुमार सोहम चिंदरकर कुमार वेदांत चिंदरकर श्री. स्वप्निल चिंदरकर श्री महेंद्र चिंदरकर यांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन श्री. आडे सर यांनी केले.