करमळीवाडी आणि बिजोळेवाडी वाड्या आंदुर्ले विज केंद्राला जोडणार ; काम सुरु

माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांच्या मागणीला यश
वालावल सरपंच अमृत देसाई यांची माहिती
कुडाळ : तालुक्यातील हुमरमळा-वालावल गावातील करमळीवाडी व बिजोळेवाडी या दोन वाड्या नेरुर विज केंद्रा ऐवजी आंदुर्ले विज केंद्राला जोडाव्यात म्हणजे वारंवार लाईट जाण्याचे प्रकार होणार नाहीत अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी केली होती. या मागणीला यश येऊन विज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती हुमरमळा वालावल सरपंच अमृत देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री देसाई म्हणतात, हुमरमळा-वालावल गावातील करमळीवाडी,बिजोळेवाडी या दोन वाड्या झाडीने वेढलेल्या आणि दाटीवाटीने असल्याने लाईट जाण्याचे प्रमाण जास्त आहे. तसेच नेरुर केंद्राला या दोन वाड्या जोडल्याने लाईटचा लोड कदाचित जास्त असु शकतो. तसेच लाईट दोन ते तीन दिवस गायब असते. त्यामुळे लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असते.
यासाठी आमचे माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी गेली दोन वर्षे या मागणीचा पाठपुरावा आणि संबधित अधिकाऱ्यांबरोबर पाठपुरावा करत होते. त्यांच्या या मागणीला यश येऊन प्रत्यक्ष विज अधिकारी यांनी काम सुरू केले आहे. येत्या काही दिवसांत या कामाला सुरुवात होऊन लाईटमुळे त्रस्त करमळीवाडी आणि बिजोळेवाडी येथील विज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे, असे श्री देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.